अजबच आहे राव! परदेश दौऱ्यात पुतिन आपली पॉटीही सोडत नाही, पूप सुटकेसमध्ये भरून परत रशियाला नेतात, पण का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Putin Poop Suitcase : असं म्हटलं जातं जेव्हा पुतिन परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांचे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत एक खास सुटकेस घेऊन जातात, ज्यात त्यांची विष्ठा म्हणजेच पॉटी सुरक्षित ठेवली जाते.
advertisement
1/5

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन यांची सुरक्षा जगातील सर्वात कडक सुरक्षा मानली जाते आणि ती रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस (FSO) च्या जबाबदारीखाली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं.
advertisement
2/5
पुतिन यांच्याबद्दल एक अतिशय मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांची पूप सूटकेस. असं म्हटलं जातं की जेव्हा पुतिन परदेशात प्रवास करतात तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत एक विशेष सूटकेस घेऊन जातात, ज्यामध्ये त्यांची विष्ठा सुरक्षित ठेवली जाते.
advertisement
3/5
पुतिन यांची विष्ठा कधीही परदेशात टाकली जात नाही. ती सुरक्षितपणे सीलबंद पिशवीत रशियाला परत नेली जाते. रशियन फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस (FPS) चे कर्मचारी पुतिन यांची विष्ठा एका खास सीलबंद बॅगेत ठेवतात आणि ब्रीफकेसमध्ये रशियाला परत घेऊन जातात.
advertisement
4/5
याचं कारण म्हणजे दुसऱ्या देशातील कोणतीही एजन्सी त्यांच्या विष्ठेची तपासणी करू शकत नाही आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही माहिती बाहेर पडू नये.
advertisement
5/5
गेल्या काही वर्षांपासून व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. कधी म्हटलं जातं की त्यांना कर्करोग आहे, तर कधी पार्किन्स. रशियन सरकारने हे दावे सातत्याने नाकारले आहेत. पुतिन यांचे सरकार कोणत्याही परदेशी शक्तींना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देऊ इच्छित नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अजबच आहे राव! परदेश दौऱ्यात पुतिन आपली पॉटीही सोडत नाही, पूप सुटकेसमध्ये भरून परत रशियाला नेतात, पण का?