TRENDING:

सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले 'हे' आहेत जगातले टॉप 10 देश; भारताचा क्रमांक कितवा?

Last Updated:
भारताकडे नेमका किती सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याबाबत कोणता देश आघाडीवर आहे आणि या देशांकडे किती सोनं आहे, असे प्रश्न आता प्रत्येकाला पडले आहेत.
advertisement
1/11
सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले 'हे' आहेत जगातले टॉप 10 देश; भारताचा क्रमांक कितवा
सोन्याचं महत्त्व खूप आहे. सोन्याचा वापर केवळ दागिन्यांसाठीच केला जात नाही तर महागाईपासून बचाव करण्यासाठी एक चांगला उपाय म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही वर्षांत जगातल्या ज्या देशांनी सर्वाधिक सोनं खरेदी केलं, अशा देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे; पण जगातला सर्वांत जास्त सोन्याचा साठा कोणाकडे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/11
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा सोन्याचा साठा जगातला सर्वांत मोठा आहे. अमेरिकेकडच्या साठ्यात 8,133.46 टन सोनं आहे. या सोन्याची किंमत सुमारे 5,43,499.37 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 45 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
advertisement
3/11
सोन्याच्या साठ्याबाबत जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे. या देशाकडे 3,352.65 टन सोन्याचा साठा आहे. या सोन्याची एकूण किंमत 2,24,032.81 दशलक्ष डॉलर्स आहे.
advertisement
4/11
सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या टॉप टेन देशांमध्ये इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीकडे 2,451.84 टन सोन्याचा साठा आहे. इटलीकडे असलेल्या सोन्याचं एकूण मूल्य अंदाजे 1,63,838.19 दशलक्ष डॉलर्स इतकं आहे.
advertisement
5/11
फ्रान्स हा देश सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रान्स सरकारच्या तिजोरीत एकूण 2,436.88 टन सोनं आहे. फ्रान्समधल्या सोन्याच्या साठ्याचं मूल्य 1,62,844.72 दशलक्ष डॉलर्स आहे.
advertisement
6/11
युक्रेनशी युद्ध करत असलेला रशिया सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या देशाकडे 2,332.74 टन सोनं आहे. या सोन्याच्या साठ्याचं मूल्य 1,55,880.00 दशलक्ष डॉलर्स आहे.
advertisement
7/11
जगात चीनच्या खाणींतून सर्वाधिक सोनं मिळतं; पण हा देश सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. चीनचा सोन्याचा साठा 2,235.39 टन आहे. या सोन्याची किंमत 1,49,374.61 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.
advertisement
8/11
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत सातव्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे. या देशाकडे 1,040.00 टन सोनं असून, त्याची एकूण किंमत 62,543.91 दशलक्ष डॉलर्स आहे.
advertisement
9/11
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जपान आठव्या स्थानावर आहे. या आशियाई देशाकडे 845.97 टन सोनं आहे. त्याची एकूण किंमत सुमारे 56,530.15 दशलक्ष डॉलर्स आहे.
advertisement
10/11
मार्च 2024 अखेर भारताचा सोन्याचा साठा 822. 9 टन होता. सर्वांत जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने 27.5 टन सोन्याची खरेदी केली.
advertisement
11/11
या यादीत दहाव्या स्थानावर नेदरलँड्स हा देश आहे. या देशाकडे 612.45 टन सोन्याचा साठा आहे. या साठ्याची एकूण किंमत 40,925.77 दशलक्ष डॉलर्स आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले 'हे' आहेत जगातले टॉप 10 देश; भारताचा क्रमांक कितवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल