TRENDING:

Weird place - इथं येताच अचानक बंद होतात संपूर्ण ट्रेनमधील लाइट्स, प्रत्येक डब्यात होतो अंधार; रेल्वे स्टेशनचं शॉकिंग रहस्य

Last Updated:
असं या रेल्वे स्टेशनवर काय आहे की इथं येताच ट्रेनची बत्ती गूल होते?
advertisement
1/5
इथं येताच अचानक बंद होतात संपूर्ण ट्रेनमधील लाइट्स; रेल्वे स्टेशनचं शॉकिंग रहस्य
देशात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत, जिथं असं काही घडतं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. असंच हे एक ठिकाण, जिथून ट्रेन जाताच अचानक ट्रेनमधील लाइट्स बंद होतात. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
तामिळनाडूच्या चेन्नईतील हे तांबरम रेल्वे स्टेशन. या स्थानकावरून ट्रेन सुटताच दिवे बंद होतात. यामागील कारण फार कमी लोकांना माहिती आहे. अशा जागांना न्यूट्रल सेक्शन म्हणतात. ही अशी ठिकाणं असतात जिथं नवा करंट झोन सुरू होतो. रेल्वेमार्फत असे न्यूट्रल सेक्शन मुद्दाम बनवले जातात. (फोटो - विकीपीडिया)
advertisement
3/5
ट्रेनला ओव्हरहेड वायरमधून वीजपुरवठा होता. एकाच झोनमधून लांब मार्गाला वीज देणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेक झोन बनवले जातात आणि त्यामार्फत वीजपुरवठा केला जातो. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
तांबरमजवळही असाच न्यूट्रल सेक्शन आहे. जिथं ट्रेनला विद्युतपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरमध्ये विद्युतप्रवाह खंडित होत. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये वीज येणे बंद होतं आणि ट्रेनमधील लाइट्स बंद होतात. (फोटो - विकीपीडिया)
advertisement
5/5
ही समस्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये होत नाही. कारण बहुतेक एक्स्प्रेस अशा वेळी गाडी डिझेलवर स्विच करतात. तसंही झालं नाही तर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वीज साठवलेली असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी ट्रेनमधील लाइट्स सुरू असतात. (प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird place - इथं येताच अचानक बंद होतात संपूर्ण ट्रेनमधील लाइट्स, प्रत्येक डब्यात होतो अंधार; रेल्वे स्टेशनचं शॉकिंग रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल