Train Ticket : रेल्वे तिकीटचा असाही वापर, 99% लोकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Train ticket booking : रेल्वेनं प्रवास करायचा म्हणून आपण रेल्वेचं तिकीट काढतो. पण हे तिकीट फक्त प्रवास करण्यासाठी नाही तर अनेक ठिकाणी कामी येतं. म्हणजे रेल्वे तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशांना अनेक अधिकार मिळतात, त्यांना अनेक सुविधा मोफत मिळतात.
advertisement
1/5

च्या एसी1, एसी2, एसी3 च्या सर्व कोचमध्ये दोन बेडशीट, एक पांघरूण आणि एक उशी, एक छोटं टॉवेल मिळते. गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये यासाठी अतिरिक्त 25 रुपये द्यावे लागतात. काही ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये बेडरोलही मिळतात. तुम्हाला ट्रेन प्रवासादरम्यान बेडरोल मिळाले नाही तर तुम्ही याबाबत तक्रार करून रिफंडचा दावा करू शकता.
advertisement
2/5
ट्रेन प्रवास करताना तुम्हाला आजारी पडल्यासारखं वाटत असेल किंवा तुम्ही आजारी पडलात तर रेल्वे तुम्हाला मोफत प्राथमिक उपचार देते. प्रकृती गंभीर असेल तर पुढील उपचारांचीसुद्धा व्यवस्था केली जाते. यासाठी तुम्ही तिकीट कलेक्टर, ट्रेन अधीक्षक यांच्याशी संपर्क करू शकता.
advertisement
3/5
जर तुम्ही राजधानी, दुरंतो आणि शताब्दीसारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन दोन तासांहून अधिक लेट असेल तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देतं. जर तुमची ट्रेन उशिरानं असेल आणि तुम्हाला काही चांगलं खायचं असेल तर तुम्ही आर ई कॅटरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून ट्रेनमध्येही जेवण मागवू शकता.
advertisement
4/5
देशातल्या सर्व प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर क्लोकरूम आणि लॉकरूम असतात. जिथं तुम्ही जास्तीत जास्त एक महिना तुमचं सामान ठेवू शकता. यासाठी थोडे पैसे तुम्हाला मोजावे लागतात.
advertisement
5/5
कोणत्याही स्टेशनवर उतरल्यावर पुढची ट्रेन पकडण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी स्टेशनवर काही वेळ थांबायचं असेल तर तुम्ही एसी किंवा नॉन एसी वेटिंग हॉलमध्ये आरामात थांबू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनचं तिकीट दाखवावं लागतं.