सगळे गाढ झोपेत होते, अचानक आला मोठा आवाज, नागपुरातील घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Metal object fall from sky to house in nagpur : नागपुरातील एका घरावर एक रह्स्यमयी धातूचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी का तुकडा आकाशातून पडल्याचा दावा केला आहे. हे नेमकं काय आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
1/5

काही वेळा अशा घटना घडतात की या घटनांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्यांचं रहस्य उलगडता उलगडत नाही. सध्या अशीच एक घटना घडली ती नागपुरात. जिथं एका इमारतीवर आकाशातून धातूचा तुकडा पडला आहे.
advertisement
2/5
नागपुर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यातील ही घटना. शनिवारी पहाटे 4 वाजता एक धातूचा तुकडा घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
3/5
एका मोठ्या स्फोटचा आवाज आला आणि आवाज येताच सर्व लोक घाबरून घराबाहेर पडले. लेआऊटमधील स्थानिक नागरिक अमय बसेश्वर यांचा घरावर धातूचा तुकड पडल्यानं छतावरील भिंतीचा भागही तुटला.
advertisement
4/5
हा तुकडा 50 किलो वजनाचा असून, अंदाजे 10 ये 12 मिमी जाडीचा आणि 4 फूट लांब आहे. हा तुकडा आकाशातून घराच्या इमारतीवर पडला असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं..
advertisement
5/5
पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर धातूचा तुकडा कशाचा आहे हे कळू न शकल्याने पुढील तपास सुरू केला आहे. हा तुकडा पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
सगळे गाढ झोपेत होते, अचानक आला मोठा आवाज, नागपुरातील घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ