बापरे! दीडशे किलोचा मासा, किंमत 70 हजार रुपये, कुठे मिळाला वाचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मासे हा मांसाहारप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काहीजणांना मोठे मासे खायला आवडतात, तर काहीजण लहान मासे चवीने खातात. अलिकडेच एक भलामोठा मासा मासेमारांच्या जाळ्यात अडकला. तब्बल 150 किलो इतकं या अवाढव्य माशाचं वजन आहे.
advertisement
1/5

पश्चिम बंगालच्या दिघा भागात आढळलेल्या या महाकाय माशाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. दिसायला मोठ्या आणि सुंदर अशा या माशाची चव किती भारी असेल, असा विचारही अनेकांच्या मनात आला.
advertisement
2/5
तर याउलट अनेकांनी या माशाचा आकार आणि वजन पाहून हा एखादा राक्षस असल्याचं म्हटलं. त्याच्या चवीचा विचार तर दूरच मात्र त्याला पाहायलाही ते घाबरत होते.
advertisement
3/5
या माशाचं डोकं अत्यंत मोठं आहे. त्वचेचा रंग मात्र इतर माशांसारखाच आहे. शिवाय भोळा नावाच्या या माशाचे अनेक फायदेही आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.
advertisement
4/5
मागणी मोठी आणि फायदे जास्त यामुळे मासे सामान्यतः महागच असतात. मात्र या 150 किलोच्या माशासाठी तब्बल 70 हजार रुपयांची बोली लागली आणि त्याच किंमतीत त्याची विक्री झाली. ओडिसाच्या एका मासे विक्रेत्यांनी त्याची खरेदी केली.
advertisement
5/5
दरम्यान, हा मासा समुद्राच्या तळाशी आढळतो. त्याचा वापर औषधं बनवण्यासाठी केला जातो. म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी मिळते. जाळ्यात चुकून हा मासा अडकल्यास मासेमार प्रचंड खुश होतात. दिघामध्ये तो आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी पर्यटकसुद्धा दाखल झाले होते.