TRENDING:

पृथ्वीवरुन कॉकरोच गायब झाले तर काय होईल? 'याने कोणाला काय फरक पडणार' असा विचार करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुक करताय

Last Updated:
कधीकधी तर कितीही साफसफाई केली तरी देखील हे कॉकरोच घरात किचनमध्ये फिरताना दिसतात. अशात लोक कधी घरगुती उपाय, तर कधी हिट, तर कधी आणखी काही लेक्विड घेऊन साफसफाईच्या मोहिमेवर लागतात.
advertisement
1/9
कॉकरोच गायब झाले तर? फरक पडणार नाही असा विचार करत असाल  तर खूप मोठी चुक करताय
घरात कॉकरोच दिसल की डोकेदुखीच ठरते. कारण एकदा का ते कॉकरोच घरात शिरले की कितीही केल्या लवकर घराबाहेर पडत नाहीत. कधीकधी तर कितीही साफसफाई केली तरी देखील हे कॉकरोच घरात किचनमध्ये फिरताना दिसतात. अशात लोक कधी घरगुती उपाय, तर कधी हिट, तर कधी आणखी काही लेक्विड घेऊन साफसफाईच्या मोहिमेवर लागतात.
advertisement
2/9
बहुतेक लोकांच्या डोक्यात हा समजच बसला आहे की कॉकरोच म्हणजे घाण, अस्वच्छता आणि त्रास. म्हणून अनेकांना वाटतं की जर हे कीटक पृथ्वीवरून पूर्णपणे गायब झाले, तर जीवन आणखी सोपं होईल.
advertisement
3/9
कॉकरोच नाहीसे झाले, तर त्याचा सर्वात मोठा फटका निसर्गाला, शेतीला, जमिनीच्या आरोग्याला आणि संपूर्ण फूड-चेनला बसेल. वैज्ञानिक म्हणतात की हा छोटासा कीटक पृथ्वीच्या इकोसिस्टममधील एक ‘अदृश्य हिरो’ आहे.
advertisement
4/9
कॉकरोच म्हणजे जंगलांचं क्लीनिंग मशीनआपल्याला वाटतं कॉकरोच फक्त घरात असतात. पण खरं पाहिलं तर बहुतांश कॉकरोच जंगलात राहतात.
advertisement
5/9
ते काय करतात?सुकलेली पानं, गळालेल्या फांद्या, सडलेली झाडं, वनस्पतींचा कचरा हे सगळं चघळून ते अतिशय छोट्या तुकड्यांमध्ये बदलतात. मग हाच कचरा परत मातीला पोषण देणाऱ्या पोषक द्रव्यांमध्ये रूपांतरित होतो.जर कॉकरोच नाहीसे झाले तर जंगलात जैविक कचरा थर थर जमा होईल, विघटनाची प्रक्रिया मंदावेल, जमिनीची सुपीकता घटेल आणि वनव्यवस्था हळूहळू कमकुवत होऊ लागेल.आपल्याला एक छोटा कीटक गायब झाला तर फार काही फरक पडणार नाही असे वाटते. पण निसर्गात छोट्या गोष्टींचा मोठा प्रभाव असतो.
advertisement
6/9
कॉकरोच हे अनेक जीवांचे अन्न असतात: ज्यामध्ये सरडे, बेडूक, पक्षी, लहान सस्तन प्राणी आणि अनेक कीटकांचा समावेश आहे. पण जर हेच गायब झाले तर त्याचा अन्नसाखळीवर परिणाम होईल, या शिकार करणाऱ्या प्राण्यांना नवीन अन्न शोधावं लागेल. हा खरा ‘डोमिनो इफेक्ट’ असेल. कॉकरोच म्हणजे चालती-बोलती नायट्रोजन फॅक्टरी. वैज्ञानिक संशोधनानुसार कॉकरोचच्या शरीरात Blattabacterium नावाचा बॅक्टेरिया असतो.हा बॅक्टेरिया सडलेल्या पदार्थातून नायट्रोजन तयार करतो आणि त्याचं अमीनो अॅसिड, व्हिटॅमिनमध्ये रूपांतर करतो, म्हणूनच कॉकरोच अतिशय कठीण परिस्थितीतसुद्धा जगू शकतात आणि जिथे इतर कीटक जाऊ शकत नाहीत तिथेही इकोसिस्टमचं संतुलन राखतात.
advertisement
7/9
कॉकरोच शेतांच्या आसपास सडलेलं गवत, पाने, जैविक कचरा तोडून जमिनीत मिसळतात. ते नाहीसे झाले तर जैविक कचरा विघटित होण्याचा वेग घटेल, जमिनीत नायट्रोजन कमी होईल, शेतकऱ्यांना रासायनिक खतं जास्त टाकावी लागतील, जास्त खतांमुळे पाणी आणि मातीचं प्रदूषण वाढेल म्हणजेच कॉकरोच हे शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यामागचे लपलेले मदतनीस आहेत.
advertisement
8/9
जंगलात राहणारे कॉकरोच पर्यावरणातील बदलांचे पहिले संकेत देतात, त्यांची संख्या वाढली किंवा कमी झाली तर वैज्ञानिक लगेच त्या भागात काय बदल झाले आहेत ते समजून घेतात. कॉकरोचच नसतील तर हा नैसर्गिक ‘अलार्म सिस्टम’च गायब होईल.
advertisement
9/9
कॉकरोच गेले तर पृथ्वी आजारी पडेल. हो, घरात ते त्रास देतात हे खरं आहे. पण निसर्गासाठी ते अनमोल आहेत. त्यामुळे कॉकरोच नसले तर जंगलांचं विघटन थांबेल, जमिनीची सुपीकता कमी होईल, अनेक जीवांचं अस्तित्व धोक्यात येईल, फूड-चेन तुटेल, शेतीवर मोठा दबाव येईल आणि संपूर्ण इकोसिस्टम कमकुवत होईल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पृथ्वीवरुन कॉकरोच गायब झाले तर काय होईल? 'याने कोणाला काय फरक पडणार' असा विचार करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुक करताय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल