Honeymoon Hotel : हॉटेलच्या बेडवर ही रंगीत कापडाची पट्टी का असते? हनीमूनला गेलेल्या कपलला माहिती हवंच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honeymoon Hotel Bed Clothes : हनीमूनला गेलेले कपल हॉटेलमध्ये राहतात. त्यामुळे हॉटेलमधील काही गोष्टी त्यांना माहिती असायला हव्यात. त्यापैकी एक म्हणजे बेडशीटवर असलेली कापडाची पट्टी.
advertisement
1/7

हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही पाहाल की बेडच्या खालच्या बाजूला एक कापड ठेवलेलं दिसेल. पहिल्यांदाच पाहताच क्षणी हे ब्लँकेट वाटेल पण ते ब्लँकेट नसतं. तर फक्त एक कापडाची पट्टी असते. अनेकांना ही पट्टी फक्त सजावटीसाठी ठेवली असावी असते असं वाटतं. पण या छोट्याशा कापडाचे बरेच फायदे आहेत. याबाबत अनेकांना माहिती नाही. लग्नानंतर हनीमूनला जाणाऱ्या कपल्सना तर हॉटेलमधील या पट्टीचा वापर माहिती असायलाच हवा.
advertisement
2/7
हॉटेलच्या बेडवर अंथरलेलं हे कापड मुख्यतः सौंदर्य वाढवण्यासाठी असतं. संपूर्ण पांढऱ्या बेडशीटवर रंगीत आणि डिझायनर कापड उठून दिसतं आणि खोलीला एक उठावदार लुक मिळतो. त्यामुळे हॉटेलमध्ये आल्यावर पाहणाऱ्यावर चांगला प्रभाव पडतो.
advertisement
3/7
अनेक लोक हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची मजा थेट बेडवर घेतात. पण पांढऱ्या चादरींवर खाण्याचे डाग पडण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हे गडद रंगाचं कापड उपयोगी ठरतं, कारण त्यावर खाण्याचे कण, चहा-कॉफीचे डाग सहज दिसत नाहीत आणि ते सहज धुण्यायोग्य असतं. तसंच लहान मुलं असतील आणि ते बेडवर काही खात असतील, तर त्यांना या कापडावर बसवून खायला दिलं, तर नंतर साफसफाईही सोपी होते.
advertisement
4/7
हॉटेलमध्ये रूममध्ये शिरल्यानंतर अनेक लोक आपली बॅग, सामान थेट बेडवर ठेवतात. पण या वस्तूंवर बाहेरचं धूळ, बॅक्टेरिया किंवा घाण असू शकते, जे थेट पांढऱ्या चादरींवर आल्यास अस्वच्छतेची शक्यता वाढते. अशावेळी या कापडावर त्या वस्तू ठेवणं अधिक स्वच्छ आणि सुरक्षित ठरतं.
advertisement
5/7
युरोप आणि इतर देशांमध्ये अनेक लोक घरात किंवा हॉटेलमध्येही बूट किंवा मोजे घालूनच बेडवर बसतात. अशावेळी त्यांच्या पायांनी बेडशीटवर घाण होऊ शकते. त्यामुळे हे कापड 'फुटरेस्ट'सारखं काम करतं. पाय त्या कापडावर ठेवल्यास चादरी स्वच्छ राहतात आणि बेड वापरणाऱ्यालाही त्रास होत नाही.
advertisement
6/7
काही लोक प्रवासातही व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा योगा करत असतात. अशा वेळी त्यांच्याकडे मॅट नसेल, तर हे कापड एक तात्पुरती मॅट म्हणून वापरता येते. तसंच महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात सुरक्षा म्हणून हे कापड उपयोगी ठरू शकतं.
advertisement
7/7
एकंदर काय तर हॉटेल बेडवर पायाजवळ ठेवलेलं हे कापड फक्त डिझाइनसाठी नसून त्याचे अनेक उपयोग आहेत. आता पुढच्या वेळी हॉटेलमध्ये गेल्यावर या कापडाचा वापर योग्य प्रकारे वापर कसा करायचा तुम्हाला हे माहित पडेलच.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हॉटेलच्या बेडवर ही रंगीत कापडाची पट्टी का असते? हनीमूनला गेलेल्या कपलला माहिती हवंच