TRENDING:

Knowledge : Newspaper च्या तळाला का असतात असे रंगीत ठिपके? खूपच रंजक आणि कामाचं आहे यामागचं कारण

Last Updated:
दररोज वर्तमानपत्र वाचणारे अनेक असतात, मात्र वर्तमानपत्राची निर्मिती कशी होते, त्याची छपाई, वितरण या गोष्टी फार थोड्या लोकांना माहीत असतात. वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचलं तर पानाच्या तळात विविध रंगांचे चार ठिपके छापलेले आढळतात. वर्तमानपत्रावर छापल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही अर्थ असतो. तसाच त्या चार ठिपक्यांनाही असतो. चार रंग दाखवणारे हे ठिपके नेमकं काय सांगतात?
advertisement
1/6
Newspaper च्या तळाला का असतात असे रंगीत ठिपके? खूपच रंजक आहे यामागचं कारण
वर्तमानपत्राच्या खालच्या भागात पिवळा, निळा, गुलाबी आणि काळा असे चार रंगांचे गोल ठिपके दिलेले असतात. काळजीपूर्वक पाहिल्यास प्रत्येक वृत्तपत्रावर हे ठिपके दिलेले आढळतील. ते ठिपके प्रत्येक वर्तमानपत्रावर छापलेले असतात. ते केवळ शोभा वाढवण्यासाठी देत नाहीत, तर त्यामागे विशिष्ट कारण असतं. ते काय असतं हे जाणून घ्या
advertisement
2/6
इंग्रजीमध्ये सीएमवायके अर्थात सियान (निळा), मॅजेंटा (गुलाबी), पिवळा आणि (की) काळा असे चार रंग दर्शवणारे ते चार ठिपके असतात. वर्तमानपत्राची छपाई करताना त्यात या चारही रंगांच्या शाईचं योग्य प्रमाणात मिश्रण करून विविध रंग तयार करण्यात आले आहेत, हे दर्शवण्यासाठी ते चार रंगांचे ठिपके दिले जातात.
advertisement
3/6
वर्तनामपत्राची छपाई करताना हेच चार रंग वापरले जातात. वर्तमानपत्रासाठी कागदही वेगळ्या प्रकारचा वापरला जातो. वर्तमानपत्रावर रंग व्यवस्थित छापले जाण्यासाठी त्या रंगांच्या शाईचं योग्य प्रमाणात मिश्रण व्हायला हवं. विशेषतः फोटोंची उठावदार छपाई होण्यासाठी ते गरजेचं असतं.
advertisement
4/6
छपाईच्या प्लेट्समध्ये या रंगांची शाई ठेवून छपाई केली जाते. वृत्तपत्रातील एखादा फोटो अंधूक छापला गेला, तर त्याचा अर्थ त्या प्लेट्स एकमेकांवर आदळल्या असू शकतात.
advertisement
5/6
मुद्रित माध्यमांमध्ये याच सीएमवायके रंगांच्या मदतीने छपाई केली जाते. रंगांच्या मिश्रणाचे सीएमवायके आणि आरजीबी हे दोन प्रकार उपलब्ध असतात. त्यापैआरजीबी (लाल,हिरवा, निळा) प्रकारचे रंग शक्यतो डिजिटल माध्यमांकरिता वापरले जातात, तर सीएमवायके हे रंग मुद्रित माध्यमात वापरले जातात.
advertisement
6/6
केवळ वर्तमानपत्रच नाही तर पुस्तकांची छपाईही याच रंगांचा वापर करून केली जाते. काही वेळेला वर्तमानपत्र, पुस्तकं किंवा इतर मुद्रित साहित्याचं कटिंग करतानाही या चार ठिपक्यांचा उपयोग होतो. तयार साहित्य योग्य आकारात असेल, याचसाठी ठिपक्यांचा वापर संकेतचिन्ह म्हणूनही काहीवेळा केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : Newspaper च्या तळाला का असतात असे रंगीत ठिपके? खूपच रंजक आणि कामाचं आहे यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल