Drink Fact : दारुसोबत का खाल्ला जातो चकना? या मागचं कारण आणि इतिहास तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही चकना शिवाय दारु पिण्याचा विचार करु शकतात? भारतीय लोक जितके दारुचे शॉकिन आहेत त्यापेक्षा जास्त चकन्याचे शॉकिन आहेत. चकना जर चांगला मिळाला तर दारु पिण्याची मजा काही औरच येते.
advertisement
1/9

भारतात बहुतांश लोक दारुचे शॉकिन आहेत. दारु शरीरासाठी हानिकारक आहे, हे सगळ्यांना माहित आहे. पण असं असलं तरी देखील अनेक लोक दारु पितातच. अनेक पार्टी, कार्यक्रम हे दारु शिवाय अपूर्ण असतात. पण तुम्ही चकना शिवाय दारु पिण्याचा विचार करु शकतात? भारतीय लोक जितके दारुचे शॉकिन आहेत त्यापेक्षा जास्त चकन्याचे शॉकिन आहेत. चकना जर चांगला मिळाला तर दारु पिण्याची मजा काही औरच येते.
advertisement
2/9
दारू पिताना चकना नसलेली पार्टी कल्पनाही करता येत नाही. मित्रमैत्रिणींसोबतची गप्पा, ग्लासमध्ये पेग आणि बाजूला शेंगदाणे, चणे, चकली, चिप्स, अंड, चिकन, कबाब, फिश… हे कॉम्बिनेशन इतकं नॉर्मल झालं आहे की याशिवाय पिणंच अपूर्ण वाटतं.
advertisement
3/9
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की दारुसोबत चकना खाण्याची प्रथा किंवा पद्धत कशी आणि कुठे सुरु झाली? अनेकांना वाटतं चकना म्हणजे आधुनिक पद्धत, पण त्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे.
advertisement
4/9
प्राचीन सभ्यतांतही दारूसोबत काहीतरी खाण्याची परंपरा होती. लोक मानायचे की दारूची तीव्रता कमी करण्यासाठी आणि पिण्याचा अनुभव अधिक सुखद बनवण्यासाठी काहीतरी हलकं-फुलकं खाणं आवश्यक असतं. यामुळे शरीरावरही दारूचा ताण थोडा कमी पडतो असं मानलं जात असे.
advertisement
5/9
असं म्हटलं जातं की 1930 च्या दशकात न्यू ऑर्लियन्समध्ये बार मालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक ग्लाससोबत फ्री प्लेट (स्नॅक्स) देण्याची प्रथा सुरू केली. आयडिया सोपी होती "खाणं जितकं भारी, तितकी दारू जास्त." पोटात खाणं असल्याने लोक अधिक वेळ थांबतात, आणि अधिक पेग घेतात.
advertisement
6/9
दारूसोबत चकना का आवश्यक मानलं जातं?दारूची कडवट चव संतुलित करणं, पचन सोपं करणं आणि लोकांना जास्त वेळ ‘सोशल ड्रिंकिंग मोड’ मध्ये ठेवणं या तीन कारणांमुळे चकना आजही दारूसोबत अनिवार्य मानलं जातं. म्हणूनच आजही लोक प्रत्येक घोटानंतर चिप्स, चकली, स्नॅक्स, कबाब खाणं पसंत करतात.
advertisement
7/9
मुगलांच्या राजदरबारात दारूसोबत अतिशय रॉयल चकना दिला जात असे. त्यात खजूर, खुबानी, अंजीर, बदाम, पिस्ता, भुना मटण असे पदार्थ असायचे. म्हणजे चकना ही सवय फक्त साध्या लोकांची नाही तर राजघराण्यांचीही पद्धत होती.
advertisement
8/9
पण तुम्हाला माहितीय का की भारतभर वेगवेगळ्या प्रकारचा चकना खाल्ला जातो. प्रत्येक प्रदेशाने आपल्या चवीप्रमाणे चखन्याच्या पद्धती विकसित केल्या महाराष्ट्र : शेंगदाणे आणि उकडलेली अंडी खाल्ली जातात तर, पंजाबमध्ये तंदुरी चिकन, पनीर टिक्का खाल्ला जातो. ईशान्य भारतात स्मोक्ड मीट खाल्लं जातं. तर काही महानगरात पिझ्झा, मोमोज, मंचूरियन खाल्लं जातं.
advertisement
9/9
आज चकना हा फक्त ‘स्नॅक’ नाही, तर भारतातील दारू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. काळ बदलला, पेय बदलले, पण ग्लाससोबत येणारा चकना तो कायम तसाच महत्त्वाचा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Drink Fact : दारुसोबत का खाल्ला जातो चकना? या मागचं कारण आणि इतिहास तुम्हाला आश्चर्यचकीत करेल