TRENDING:

General Knowledge : दोन्ही हात जोडून नमस्कार का केला जातो? ही परंपरा कुठून आली? कधी असा प्रश्न पडलाय

Last Updated:
तुम्ही कधी विचार केलाय का की नमस्कार हा नेहमी दोन हात जोडूनच का केला जातो? अशापद्धतीनेच हात जोडून का नमस्कार केला जातो? कधी असा विचार केलाय
advertisement
1/8
दोन्ही हात जोडून नमस्कार का केला जातो? ही परंपरा कुठून आली? कधी असा प्रश्न पडलाय
भारतात बहुतांश हिंदू लोक आपल्या पेक्षा कोणी मोठ्या व्यक्तीला भेटल्यावर किंवा पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला नमस्कार कारतात. लोकच नाही तर आपण देवाला देखील नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हात जोडतो, असं करण्यामागे केवळ संस्कृती नाही, तर आदर, नम्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर संगम दडलाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की नमस्कार हा नेहमी दोन हात जोडूनच का केला जातो? अशापद्धतीनेच हात जोडून का नमस्कार केला जातो? कधी असा विचार केलाय?
advertisement
2/8
“नमस्कार” करत हात जोडणं ही एक इतकी नैसर्गिक क्रिया झाली आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल फारसा विचार करत नाही. पण आता हा प्रश्न उपस्थीत केल्यानंतर तुम्ही देखील काही सेकंदासाठी विचारात पडला असाल.
advertisement
3/8
भारतीय परंपरेत ‘नमस्कार’ ही क्रिया हजारो वर्षांपासून आहे. दोन हात जोडण्याला ‘अंजली मुद्रा’ म्हटलं जातं आणि त्याचा उल्लेख वेद, उपनिषदं आणि अनेक धर्मग्रंथांत आढळतो. संस्कृतमध्ये ‘नमः’ म्हणजे “मी तुम्हाला नम्रतेने वंदन करतो” असा अर्थ होतो. या क्रियेने आपण समोरच्याला समानतेचा मान देतो.
advertisement
4/8
हात जोडण्यामागे एक आध्यात्मिक कारण देखील मानलं जातं. आपल्या हातात पाच पाच बोटं म्हणजे पाच तत्त्वांचं प्रतीक भूमी, आग, तेज, वायु आणि आकाश. दोन्ही हात एकत्र आणणं म्हणजे या तत्त्वांचं संतुलन. त्यामुळे मन स्थिर राहतं आणि सकारात्मक भावना वाढीस लागतात. योगामध्ये ही मुद्रा ध्यानासाठी सर्वोत्तम मानली जाते कारण ती शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रिय करते.
advertisement
5/8
विज्ञानाच्या दृष्टीनेही नमस्काराची पद्धत महत्वाची आहे. हस्तांदोलनात शारीरिक संपर्क होतो, ज्यामुळे जंतू किंवा संक्रमण पसरण्याची शक्यता असते. पण हात जोडून नमस्कार केल्याने कोणताही शारीरिक स्पर्श होत नाही. कोविडच्या काळात हीच भारतीय पद्धत जगभरात आदर्श म्हणून पुन्हा स्वीकारली गेली. अनेक देशांच्या नेत्यांनी नमस्काराची पद्धत अवलंबून आदर व्यक्त केला.
advertisement
6/8
‘ही पद्धत कोणी सुरू केली?’ याचं नेमकं कोणा एकाचं नाव सांगता येणार नाही, कारण ती भारतीय सभ्यतेसोबतच विकसित झाली. वेदकालीन ऋषी-मुनींपासून ते राजदरबारांपर्यंत आणि नंतर सर्वसामान्य लोकांपर्यंत ही पद्धत वापरली जाऊ लागली. हिंदू धर्माबरोबरच बौद्ध, जैन, शीख परंपरांनीही नमस्काराला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे ती धर्म, भाषा किंवा प्रदेशाशी मर्यादित न राहता भारतीय संस्कृतीचं वैश्विक अभिवादन बनली.
advertisement
7/8
नमस्कार ही केवळ अभिवादनाची पद्धत नाही; ती आपल्या विनयशीलतेची ओळख आहे. एखाद्याला आदर देण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी किंवा केवळ संवादाची सुरुवात करण्यासाठी नमस्कार हा सर्वात सभ्य आणि सुंदर मार्ग आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून ही परंपरा स्थिरावली आणि आजही अभिमानाने पुढे चालते.
advertisement
8/8
दोन हात जोडणं म्हणजे माणसामाणसांमधील अंतर कमी करणारी, आदर दाखवणारी आणि मन शांत करणारी संस्कृती. जिला जगही आता मान देऊ लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : दोन्ही हात जोडून नमस्कार का केला जातो? ही परंपरा कुठून आली? कधी असा प्रश्न पडलाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल