General Knowledge : भारतात स्टेअरिंग उजवीकडे आणि अमेरिकेत डावीकडे का? कारण असं जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Steering position difference : भारतात स्टेअरिंग हे उजव्या बाजूला असतं तर परदेशात ते डाव्या बाजूला असतं. दोन्ही देशांच्या अशा नियमांमागे आपली आपली कारणं आहेत. चला सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/8

तुम्ही अनेकदा व्हिडीओ, सिनेमामध्ये पाहिलं असेल की भारतातील कार आणि परदेशातील कारचं स्टेअरिंग हे वेगवेगळ्या बाजूला असते. पण असं का? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे? दोन्ही कडील कार कंपन्या असं का करतात?
advertisement
2/8
खरंतर यामागे केवळ रस्त्याचा नियमच नाही, तर इतिहास, परंपरा आणि वापराची सोय अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. आजही जगभरात अनेक देशांमध्ये स्टीअरिंग व्हीलची पोझिशन वेगवेगळी आढळते आणि याचा थेट परिणाम वाहन चालवण्याच्या पद्धतीवर होतो.
advertisement
3/8
भारतात स्टेअरिंग हे उजव्या बाजूला असतं तर परदेशात ते डाव्या बाजूला असतं. दोन्ही देशांच्या अशा नियमांमागे आपली आपली कारणं आहेत. चला सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
4/8
भारतात स्टीअरिंग उजव्या बाजूला का?भक्त भारतच नाही तर ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या काही मोजक्या देशांमध्ये गाड्यांचं स्टीअरिंग व्हील उजव्या बाजूला असतं. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत. भारतात ब्रिटीश राजवटीच्या काळात मोटारगाड्या प्रथम वापरात आल्या. त्या काळात ब्रिटनमधून आयात होणाऱ्या गाड्यांमध्ये स्टीअरिंग उजव्या बाजूला असायचं, कारण ब्रिटनमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहनं चालवली जातात.
advertisement
5/8
भारतात ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या सत्तेनंतर भारतीय नागरिकांना उजव्या स्टीअरिंगची सवय झाली होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही भारतीय वाहन उत्पादकांनी हीच रचना कायम ठेवली. आज भारतातही वाहनं डाव्या बाजूने चालवली जातात, म्हणून स्टीअरिंग उजव्या बाजूला ठेवणं अधिक सोयीचं ठरतं.
advertisement
6/8
अमेरिकेत स्टीअरिंग डाव्या बाजूला का?अमेरिका आणि युरोपातील बहुतांश देशांमध्ये स्टेअरिंग व्हील डाव्या बाजूला असतं. यामागचं मूळ 18व्या शतकातील अमेरिकन घोडागाड्यांमध्ये आहे. त्या काळी "टीमस्टर्स" नावाचे घोडागाडी चालक डाव्या बाजूला बसत आणि उजव्या बाजूला सामान ठेवत. त्यामुळे पुढे जेव्हा कार तयार केल्या गेल्या, तेव्हा हीच सवय पुढे नेण्यात आली
advertisement
7/8
अमेरिकेतील वाहनं रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतात. अशा वेळी स्टेअरिंग डावीकडे असणं चालकासाठी अधिक सोयीचं ठरतं, कारण त्याला समोरून येणाऱ्या गाड्या आणि वळणं अधिक स्पष्ट दिसतात. याच लॉजिकनुसार युरोपातील अनेक देशांनीही डाव्या स्टेअरिंगचा अवलंब केला.
advertisement
8/8
गाडीचं स्टीअरिंग डावीकडे की उजवीकडे हे मुख्यतः त्या देशातील वाहतुकीच्या नियमांवर आणि ऐतिहासिक परंपरेवर अवलंबून असतं. भारतात उजव्या बाजूचं स्टेअरिंग ब्रिटिश वारशामुळे आलेलं आहे, तर अमेरिकेत डाव्या बाजूचं स्टेअरिंग पारंपरिक वापर आणि वाहतुकीच्या नियमानुसार निश्चित झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारतात स्टेअरिंग उजवीकडे आणि अमेरिकेत डावीकडे का? कारण असं जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल