General Knowledge : हाताच्या तळव्यावर केस का उगवत नाहीत? कारण ऐकून आश्चर्य वाटेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हाताच्या तळव्यावर आणि पायाच्या तळव्यावर मात्र एकही केस नसतो. असं का बरं होतं? चला, यामागचं कारण जाणून घेऊया.
advertisement
1/6

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या शरीरावर डोक्यापासून ते पायापर्यंत केस असतात. काही ठिकाणी लहान, तर काही ठिकाणी मोठे केस असतात. पण हाताच्या तळव्यावर आणि पायाच्या तळव्यावर मात्र एकही केस नसतो. असं का बरं होतं? चला, यामागचं कारण जाणून घेऊया.
advertisement
2/6
तळव्यावर केस का नसतात?हाताच्या आणि पायाच्या तळव्याची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत वेगळी असते. या भागात केस उगवण्यासाठी आवश्यक असणारे रोमछिद्र (follicles) नसतात. त्यामुळे इथे केस वाढत नाहीत.
advertisement
3/6
तळव्यावरील त्वचा इतर भागांपेक्षा जाड असते. जाड त्वचेवर केस उगवण्यासाठी जागाच राहत नाही. त्यामुळेही या ठिकाणी केस नसतात.
advertisement
4/6
आपल्या त्वचेत साधारणपणे तेल तयार करणाऱ्या ग्रंथी (sebaceous glands) असतात, ज्यामुळे केस मऊ आणि त्वचा चमकदार राहते. पण तळव्यावर या ग्रंथी खूपच कमी असतात. यामुळे केस वाढण्याची शक्यता कमी होते.
advertisement
5/6
शरीरात काही प्रथिनं असतात जी केस वाढण्यास अडथळा करतात. तळव्यावर या प्रकारची प्रथिनं अधिक प्रमाणात असल्यामुळे इथे केस उगवत नाहीत.
advertisement
6/6
खरं तर तळव्यावर केस नसल्यामुळे आपल्याला वस्तू नीट पकडता येतात आणि स्पर्श अधिक स्पष्टपणे जाणवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : हाताच्या तळव्यावर केस का उगवत नाहीत? कारण ऐकून आश्चर्य वाटेल