घराबाहेर काळ्या पिशव्या का लटकवत आहेत लोक? याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Black plastic bag outside home : घराबाहेर प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या लटकवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक असं का करत आहेत? याचा फायदा काय आहे?
advertisement
1/5

तुम्ही गल्लोगल्ली किंवा घराबाहेर लाल रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या पाहिल्या असतील. कुत्र्यांना दूर ठेवण्यासाठी असं केलं जातं. पण आता काही लोक घराबाहेर काळ्या पिशव्याही लटकवू लागले आहेत.
advertisement
2/5
काळ्या पिशव्यांमध्ये कागद भरून ते बाहेर लटकवले जात आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा जुगाड नेमका आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
3/5
लोकांच्या मते, काळ्या पिशव्या अशा लटकवल्याने तिथं कबूतर येत नाहीत. या काळ्या पिशव्यांना ते कावळा समजतात आणि जवळ येत नाहीत.
advertisement
4/5
काही वेबसाईटमध्ये दावा केला आहे की, काळी पिशवी किंवा काळा कपडा असेल तिथं कबूतर येत नाही. पण कबूतर काळ्या पिशव्यांना घाबरतात असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
advertisement
5/5
न्यूज18मराठीसुद्धा या दाव्याचं समर्थन करत नाही. पण तुम्ही कबुतराच्या त्रासाला वैतागला असाल तर हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.