Safety Pin : सेफ्टी पिनला हा होल का असतो? आहे मोठा कामाचा, अनेकांना माहिती नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Safety Pin Facts : सेफ्टी पिन सामान्यपणे साड्यांना लावला जातो, म्हणून काहीजण त्याला साडी पिन म्हणूनही ओळखतात. साडीचा पदर खांद्यावर टिकून राहावा यासाठी याचा वापर कित्येक महिला करतात. शिवाय चैन तुटली, कापड फाटलं की तात्पुरत्या स्वरूपात सेफ्टी पिन लावून ते बंद करता येतं. अशी दररोजच्या वापरातील ही सेफ्टी पिनच्या एका टोकाला छिद्र असतं, ते का? यामागील कारण अनेकांना माहिती नसेल.
advertisement
1/5

सेफ्टी पिनचा इतिहास खूप जुना आहे. लॅटिनमध्ये त्याला फायब्युले असं म्हणतात आणि कांस्य युगात युरोपमध्ये त्याचा उगम झाला. या पिनचा शोध वॉल्टर हंटने 1849 साली लावला होता. त्यांनी वायरचा तुकडा वाकवून ही स्प्रिंग-लोडेड सिस्टम तयार केली.
advertisement
2/5
त्या वेळी ते बनवण्यासाठी दोन मुख्य पद्धती वापरल्या जात होत्या उत्तर युरोपीय पद्धत ज्यात पिनमध्ये दोन वेगवेगळे भाग होते. त्यात स्प्रिंग नव्हता. एका पिनला एक छिद्र होतं आणि दुसरी पिन त्या छिद्रातून जात होती आणि हुकला चिकटत होती. ही अधिक गुंतागुंतीची रचना होती.
advertisement
3/5
मध्य युरोपीय, ग्रीक आणि इटालियन पद्धत इथं वापरलेले पिन आधुनिक सेफ्टी पिनसारखीच होती. पिन मध्यभागी स्प्रिंग असलेल्या एकाच वायरपासून बनलेली होती, ज्यामुळे लवचिकता मिळत असे. वायरचं एक टोक टोकदार होतं आणि दुसरे टोक वाकलेलं होतं, जेणेकरून टोकदार टोक आत घालता येईल.
advertisement
4/5
जर तुम्ही कधी सेफ्टी पिन काळजीपूर्वक पाहिला असेल, तर तुम्हाला त्याची रचना आणि काम करण्याची पद्धत खूपच वेगळी आढळेल. सेफ्टी पिनची रचना अगदी वैज्ञानिक आहे. त्यात दोन मुख्य भाग असतात, जे त्याच्या कार्यासाठी आवश्यक असतात.
advertisement
5/5
पिनच्या तळाशी असलेली वायर रिंग किंवा कॉइलमध्ये वाकलेली असते. हा होल स्प्रिंग म्हणून करतो. ही स्प्रिंग पिनमध्ये ताण निर्माण करते, पिनचं टोकदार टोक घट्ट धरून ठेवते. हा ताण नसेल तर पिन वारंवार उघडेल, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Safety Pin : सेफ्टी पिनला हा होल का असतो? आहे मोठा कामाचा, अनेकांना माहिती नाही