TRENDING:

Alcohol Facts : वाइन, व्हिस्की की रम, कोणती दारु नॉनवेज? एक्सपर्टकडून समजून घ्या

Last Updated:
आता प्रश्न असा आहे की वाईन, व्हिस्की आणि रम या पैकी कोणती ड्रिंक शाकाहारी आहे आणि कोणती नाही? चला याबद्दस थोडं सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/6
Alcohol Facts : वाइन, व्हिस्की की रम, कोणती दारु नॉनवेज? एक्सपर्टकडून समजून घ्या
दारू ही नेहमीच शाकाहारी असते असं तुम्हाला वाटतं का? बहुतेक लोकांचा हा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की धान्य किंवा फळांपासूनच दारु बनते पण असं नाही. कारण खरं चित्र थोडं वेगळं आहे. काही ड्रिंक्स तयार करताना प्राणिजन्य घटकांचा वापर होतो आणि त्यामुळे त्या पेयांचा समावेश नॉनव्हेज श्रेणीत होतो.
advertisement
2/6
आता प्रश्न असा आहे की वाईन, व्हिस्की आणि रम या पैकी कोणती ड्रिंक शाकाहारी आहे आणि कोणती नाही? चला याबद्दस थोडं सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/6
वाईन शाकाहारी आहे का?वाईन द्राक्षांपासून तयार केली जाते. मात्र, वाईनला स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी काही वेळा फाइनिंग एजंट्स वापरले जातात, ज्यात इसिंग्लास (माशांमधून मिळणारे कोलेजन) किंवा जिलेटिन (प्राणिजन्य पदार्थ) यांचा समावेश असतो. त्यामुळे अनेक वाईन्स नॉनव्हेज ठरतात. मात्र आजकाल काही कंपन्या व्हिगन वाईन तयार करतात ज्यामध्ये प्लांट बेस्ड मिनरल एजंट्स वापरले जातात आणि त्याचा उल्लेख बाटलीवर केला जातो.
advertisement
4/6
व्हिस्की शाकाहारी आहे का?तज्ज्ञ सांगतात की व्हिस्की पूर्णपणे शाकाहारी (व्हेगन फ्रेंडली) असते. व्हिस्की मका, राई, ज्वारी किंवा जौ यापासून तयार केली जाते आणि त्याच्या प्रक्रियेत प्राणिजन्य घटकांचा वापर केला जात नाही.
advertisement
5/6
रम शाकाहारी की नॉनव्हेज?रम गुळ किंवा ऊसाच्या रसापासून तयार केली जाते. बहुतेक रम शाकाहारी असते, पण काही ब्रँड्स फिनिशिंगसाठी जिलेटिन, अंड किंवा इसिंग्लास वापरतात. त्यामुळे तुम्हाला शाकाहारी रम प्यायची असल्यास तिच्या लेबलवर किंवा ब्रँडच्या वेबसाइटवर तपासणी करणं गरजेचं आहे.
advertisement
6/6
अल्कोहोल कोणत्याही प्रकारात असलं तरी ते शरीरासाठी हानिकारकच असतं. त्यामुळे त्याचं सेवन न केलेलंच बरं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol Facts : वाइन, व्हिस्की की रम, कोणती दारु नॉनवेज? एक्सपर्टकडून समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल