बॉसचा जीव वाचवण्यासाठी दान केली स्वतःची किडनी, महिलेने गमावली नोकरी, प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman Donate Kidney For Boss : दोन मुलांच्या आईने तिच्या बॉसचा जीव वाचवण्यासाठी तिची किडनी दान केली, पण या कृत्याची किंमत तिला नोकरी गमवावी लागली. ही हृदयद्रावक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/11

चांगल्या कर्मांचं चांगलं फळ मिळतं, असं म्हटलं जातं. पण ही म्हण कलियुगात नेहमीच खरी ठरत नाही. असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. दोन मुलांची आई असलेली एक घटस्फोटित महिला जिने आपल्या बॉसचा जीव वाचवण्यासाठी किडनी दान केली पण तिने आपली नोकरी गमावली. ज्याच्यासाठी किडनी दान केली त्याच बॉसने तिला कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
2/11
47 वर्षांची डेबी स्टीव्हन्स दोन मुलांची आई आहे आणि तिचा घटस्फोट झाला आहे. 2009 मध्ये तिने अटलांटिक ऑटोमोटिव्ह ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली, जो अब्जावधी डॉलर्सचा कार डीलरशिप होता. तिची बॉस होती 61 वर्षांची जॅकी ब्रुसिया, जी कंपनीची कंट्रोलर होती. 2010 मध्ये डेबीने कंपनी सोडली आणि फ्लोरिडाला गेली. सप्टेंबरमध्ये ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी न्यू यॉर्कला परतली आणि जुन्या डीलरशिपला भेट दिली. तिथं ब्रुसियाने तिला सांगितलं की तिला किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. विचार न करता, डेबी म्हणाली की गरज पडल्यास ती तिची किडनी दान करेल.
advertisement
3/11
काही महिन्यांनी जेव्हा डेबी लाँग आयलंडला परतली तेव्हा तिने ब्रुसियाला विचारलं की कंपनीत काही जागा आहेत का? ब्रुसियाने काही आठवड्यांतच तिला पुन्हा कामावर ठेवलं. जानेवारी 2011 मध्ये, ब्रुसियाने डेबीला तिच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि विचारलं, "तुम्ही तुमची किडनी दान करण्याबाबत गंभीर आहात का?" डेबी म्हणाली, "हो, नक्कीच. हा विनोद नाही."
advertisement
4/11
पण चाचण्यांमधून असं दिसून आलं की डेबीची किडनी ब्रुसियासाठी योग्य नव्हती. मग डॉक्टरांनी डेबीला तिची किडनी सेंट लुईस, मिसुरी येथील एका अनोळखी व्यक्तीला दान करायला सांगितली, ज्यामुळे ब्रुसिया अवयव दात्यांच्या यादीत वरच्या स्थानावर पोहोचली. 10 ऑगस्ट 2011 रोजी डेबीवर शस्त्रक्रिया झाली.
advertisement
5/11
ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी चुकून डेबीच्या पायातील मज्जातंतूला नुकसान पोहोचवलं, ज्यामुळे पोटदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण झाल्या. तिचे पाय दुखत होते, पोटात त्रास होत होता, वारंवार बाथरूमला जाणं आणि जड वस्तू उचलण्यास त्रास होत होता.
advertisement
6/11
डेबी 4 आठवड्यांनंतर कामावर परतली. तेव्हा ब्रुसियाचं वागणं बदललं होतं. ती म्हणाली, "ती माझ्याशी खूप वाईट, क्रूर, अमानुषपणे वागू लागली, न केलेल्या गोष्टींसाठीही तिच्यावर ओरडायची, डेस्कवरून उठूही देत नव्हती. बाथरूमला जाण्याआधीही परवानगी घ्यावी लागे. तिचा ओव्हरटाईम काढून घेतला, ऑफिसमध्ये हलवण्यात आलं आणि अखेर 50 मैल दूर असलेल्या डीलरशिपमध्ये बदली करण्यात आली"
advertisement
7/11
मानसिक ताणामुळे डेबीने मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला. तिने एका वकीलाचीही नियुक्ती केली. मार्च 2012 मध्ये डेबीच्या वकिलांनी कंपनीला पत्र पाठवलं. अटलांटिक ऑटोमोटिव्ह ग्रुपने कामगिरीच्या समस्या असं कारण देत डेबीला कामावरून काढून टाकलं. डेबीचा दावा आहे की तिला लेखी इशारा देण्यात आला नव्हता किंवा कामगिरी सुधारणा योजनेत ठेवण्यात आलं नव्हतं.
advertisement
8/11
एप्रिल 2012 मध्ये डेबीने न्यू यॉर्क राज्य मानवाधिकार आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की तिच्या बॉसने तिचा वापर फक्त किडनी मिळवण्यासाठी केला आणि नंतर तिला कामावरून काढून टाकलं. ऑक्टोबर 2012 मध्ये न्यू यॉर्क राज्य मानवाधिकार विभागाने असा निकाल दिला की डेबीला कामावरून काढून टाकणं हा अन्याय आहे. बोर्डाला अटलांटिक ऑटोमोटिव्ह ग्रुपने भेदभाव केल्याचं संभाव्य कारण आढळलं. डेबीचे वकील लिओनार्ड लीड्स यांनी सांगितलं की ते भेदभावाचा खटला दाखल करतील आणि लाखो डॉलर्सची नुकसानभरपाई मागतील.
advertisement
9/11
अनेक साक्ष आणि चौकशीनंतर, दोन्ही पक्षांनी 30 सप्टेंबर 2014 रोजी न्यायालयाबाहेर तोडगा काढला. तोडग्याची रक्कम गुप्त ठेवण्यात आली. अटलांटिक ऑटोमोटिव्ह ग्रुपने कधीही सार्वजनिकरित्या कबूल केलं नाही की डेबीला तिच्या पुनर्प्राप्तीमुळे काढून टाकण्यात आलं की मूत्रपिंड दानामुळे.
advertisement
10/11
डेबीने 2012 मध्ये न्यू यॉर्क पोस्टला सांगितलं, "माझ्यासाठी हा खूप वेदनादायक आणि भयानक अनुभव होता. मला खूप विश्वासघात झाल्यासारखं वाटतं. मी माझ्या बॉससाठी किडनी दाता होण्याचा निर्णय घेतला आणि त्याने माझं हृदय तोडलं. पण मला माझी किडनी दान केल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही कारण त्यामुळे एका माणसाचा जीव वाचला"
advertisement
11/11
आता तुम्ही म्हणाल 13 वर्षांनंतर ही कहाणी का व्हायरल होत आहे? तर नोव्हेंबर 2025 मध्ये ही जुनी कहाणी सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आली. रेडिटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बॉसचा जीव वाचवण्यासाठी दान केली स्वतःची किडनी, महिलेने गमावली नोकरी, प्रकरण काय?