एका लिपस्टिकची किंमत तुम क्या जानोगे! 1150000000 रुपये, इतकं त्यात काय आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Most expensive Lipstick : मेकअपच्या जगात सर्वात महागडी लिपस्टिकची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. इतक की त्याच्या किमतीत तुम्ही आलिशान फ्लॅट खरेदी करू शकता.
advertisement
1/7

आपलं आलिशान घर असावं असं कुणाल वाटत नाही. पण तुम्हाला लिपस्टिक विकून आलिशान फ्लॅट खरेदी करता येईल असं सांगितलं तर... साहजिकच आश्चर्य वाटेल. हे कसं काय शक्य आहे असं तुम्ही म्हणाल. पण प्रत्यक्षात एक अशी लिपस्टिक जी इतकी महाग आहे की त्याच्या किमतीत तुम्ही कोट्यवधींचे फ्लॅट्स खरेदी करू शकता.
advertisement
2/7

जगातील सर्वात महागडी लिपस्टिक, जी ब्युटी प्रोडक्ट्सच्या जगात ग्लॅमर, एक्सक्लुझिव्हिटी आणि स्टेटस सिम्बॉलचं एक उत्तम उदाहरण आहे. ज्याची किंमत वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. ही लिपस्टिक खरेदी करण्यासाठी तुम्ही खर्च केलेल्या पैशातून तुम्हाला कोट्यवधींचे आलिशान फ्लॅट्स मिळू शकता.
advertisement
3/7
लिपस्टिक अगदी 30 रुपयांपासून मिळते. फार फार तर एखाद्या लिपस्टिकची किंमत किती असेल काही शे, हजार रुपये. पण कोट्यवधींची लिपस्टिक ज्याची किंमत थोडीथोडके नव्हे तर तब्बल 115 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
advertisement
4/7
ही लक्झरी लिपस्टिक एच. कॉचर ब्युटी नावाच्या कंपनीने बनवली आहे. हा ब्रँड लक्झरी मेकअप उद्योगात त्याच्या नाविन्यपूर्ण डिझाइन आणि प्रीमियम उत्पादनांसाठी ओळखला जातो. या कंपनीची स्थापना 2006 मध्ये तैशा स्मिथ वॉलेस यांनी केली होती.
advertisement
5/7
ही लिपस्टिक सामान्य ग्राहकांसाठी बनवलेली नाही. तिचं लक्ष्य अब्जाधीश आणि सेलिब्रिटी आहेत, जे गोष्टींना स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. याशिवाय रेअर आणि लिमिटेड एडिशन ब्युटी प्रोडक्ट्सच्या शोधात असलेल्या लक्झरी कलेक्टर्सना लक्षात ठेवून बनवण्यात आली आहे. एका अनामिक अब्जाधीशाने त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून खरेदी केली होती.
advertisement
6/7
एच. कॉचर ब्युटी डायमंड इतका महाग असण्याचं कारण लिपस्टिकचा रंग किंवा फॉर्म्युला नाही तर त्याचं पॅकेजिंग केस आहे. पॅकेजिंग केस 18 कॅरेट शुद्ध सोन्यापासून बनलेलं आहे आणि त्यावर 1200 पिंक डायमंड जडवलेले आहेत. ही लिपस्टिक केवळ विशेष मागणीनुसार बनवली जाते. ग्राहकांच्या सूचनांनुसार पॅकेजिंग बदलता येतं.
advertisement
7/7
ही लिपस्टिक खरेदी करणाऱ्या ग्राहकाला केवळ लिपस्टिकच नाही तर लाइफटाइम रिफिल आणि ब्युटी सर्व्हिस देखील मोफत मिळते. म्हणजेच जर तुम्ही ती एकदा खरेदी केली तर ती संपल्यानंतर तुम्हाला ती पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही तर रिफिल करता येईल. ब्रँड आयुष्यभर मोफत रिफिल व्यतिरिक्त 24X7 फोन सपोर्ट देखील देतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
एका लिपस्टिकची किंमत तुम क्या जानोगे! 1150000000 रुपये, इतकं त्यात काय आहे?