Hotel : असंही एक हॉटेल, जिथं आत जाताच काढावे लागतात कपडे, घातल्यास दंड; कोणतं, आहे कुठे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Clothes Free Hotel : प्रत्येक हॉटेल त्यांच्या सेवांसाठी ओळखलं जातं. पण तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकलं आहे का जिथं कपडे घालण्यास मनाई आहे? हो, असं हॉटेल प्रत्यक्षात अस्तित्वात आहे.
advertisement
1/5

बाहेर कुठेही फिरायला गेलो की आपली कपड्यांची तयारी असते. तुम्ही असे काही हॉटेल्स पाहिले असतील जिथं कपड्यांबाबत काही नियम असतात. पण तुम्हाला सांगितलं असं एक हॉटेल आहे जिथं कपडे घालण्यास मनाई आहे, तर...
advertisement
2/5
हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. एक असं हॉटेल जिथं तुम्हाला जायचं असेल, राहायचं असेल तर तुम्हाला विना कपडे जावं लागेल. या हॉटेलमध्ये पाहुण्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण विना कपडे फिरतात. पाहुण्यांना कपड्यांशिवाय फिरण्याची आणि हॉटेलच्या सर्व सुविधांचा आनंद घेण्याची स्वातंत्र्य आहे.
advertisement
3/5
ही संकल्पना पहिल्या दृष्टीक्षेपात वादग्रस्त वाटू शकते. मालकाने या अनोख्या उपक्रमाबद्दल केवळ तपशीलच शेअर केले नाहीत तर त्याचं कारण देखील स्पष्ट केलं. मालक टिम हिग्ज लोकांना निसर्गाच्या जवळ आणू इच्छित होते. हे हॉटेल 2010 मध्ये उघडलं. इथं राहिलेल्या पाहुण्यांसाठी हे एक आवडतं ठिकाण बनलं आहे. लोकांना बाहेरील जगापासून स्वातंत्र्याची भावना येते.
advertisement
4/5
या हॉटेलची संकल्पना स्पापासून सुरू झाली. स्वित्झर्लंड, जर्मनी आणि फिनलँडमधील अनेक स्पा अशा सेवा देतात. टीमनेही असाच विचार केला. पण नंतर त्यांनी घोषणा केली की केवळ स्पाच नाही तर संपूर्ण हॉटेलसाठी असेल. यामुळे पाहुण्यांना मुक्तता मिळते. टीमच्या मते कपड्यांशिवाय सर्वांना समान वाटतं. कोणीही कोणाकडे पाहत नाही. त्यांना खूप आरामदायी वाटतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते आत्मविश्वास निर्माण करतं.
advertisement
5/5
तुम्हाला असं वाटेल की अशा हॉटेलमध्ये कोण राहिल, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इथं राहण्यासाठी लोकांची प्रतीक्षा यादी आहे. आता हे हॉटेल आहे कुठे, तर ते बर्मिंगहॅमच्या बाहेर एका शांत परिसरात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hotel : असंही एक हॉटेल, जिथं आत जाताच काढावे लागतात कपडे, घातल्यास दंड; कोणतं, आहे कुठे?