Earth Facts : 'धरती'चं आयुष्य किती? आणखी किती वर्षे राहणार पृथ्वी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
पृथ्वीचा किंवा जगाचा अंत कधी ना कधी होणार हे निश्चित. पण कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात. पण पृथ्वीचं आयुष्य किती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5

जगात जे काही अस्तित्वात आलं आहे ते नष्टसुद्धा होणार. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं. याला पृथ्वीसुद्धा अपवाद नाही. पृथ्वीचा अंत होणार हे निश्चित पण तो कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात.
advertisement
2/5
4 ते 5 अब्ज वर्षांपूर्वी सौरमंडळ तयार झालं, तेव्हाच पृथ्वीचीही निर्मिती झाली होती. पृथ्वीवरील आयुष्य हे सूर्यामुळेच आहे. म्हणजे जोपर्यंत सूर्य राहणार तोपर्यंत पृथ्वी राहणार असं म्हटलं जातं.
advertisement
3/5
सूर्यामध्ये इनेक न्यूक्लिअर रिअॅक्शन होत असतात. या न्यूक्लिअर रिअॅक्शनमुळेच ऊर्जा बनते. न्यूक्लिअर रिअॅक्शन बंद झाल्यास सूर्याचा विस्तार होईल. यानंतर सूर्य रेड जाएंट बनेल. हे रेड जाएंट पृथ्वीलाही घेरेल. ज्यामुळे पृथ्वीचा अंत होईल असं सांगितलं जातं.
advertisement
4/5
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार सूर्य जवळपास 5 अब्ज वर्षे धगधगत राहिल. म्हणजे इतकी वर्षे सूर्याचा अंत आहे. याचा अर्थ सूर्यावर अवलंबून असणाऱ्या पृथ्वीचंही आयुष्य तितकंच.
advertisement
5/5
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा यांचं समर्थन करत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)