सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध घ्या : उबाठा
विधान परीषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध घ्या, अशी विनंती उबाठा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी केली. आपण नाव द्या आम्ही ते बिनविरोध देवू”, पण सभापती पदाची निवडणूक यांच अधिवेशनात घ्या” मंत्री अशी विनंती उबाठा गटाच्या आमदारांनी केली. विधान परीषद सभापती करता उबाठा गटातून शिवसेनेत आलेल्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत आहे. अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी बिनविरोध सभापती निवडणूक घ्या असे बोलल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सर्वांची एकत्रित बैठक लावली आहे. विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी 12 वाजता पुन्हा सुरु होणार आहे.
advertisement
वाचा - 'मुख्यमंत्र्यांची ती कृती म्हणजे सभागृहाचा हक्कभंग'; वडेट्टीवारांचं नियमावर बोट
निवडणुकीवर विरोधक आक्रमक
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह संविधानाप्रमाणे चालले पाहिजे. सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे, यावर आपल्याला चर्चा करावी लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. गेली अनेक वर्षे सभापतीपद रिक्त आहे. एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतीपदाचा चार्ज ठेवू शकता, असं जयंत पाटील म्हणाले. विधानमंडळाच्या सचिवांचं काम राज्यपालांना सभापतीपद रिक्त असल्याचं कळवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. तर भाई जगताप यांनी सभापती पदाचा विषय हा महत्त्वाचा आहे. हे पद इतकी वर्ष रिकामं असताना आपल्या सचिवालयानं राज्यपालांना कळवलं का याचं उत्तर तात्काळ हवं, अशी मागणी केली.