State Budget 2024 : 'मुख्यमंत्र्यांची 'ती' कृती म्हणजे सभागृहाचा हक्कभंग'; विजय वडेट्टीवारांनी नियमावर ठेवलं बोट

Last Updated:

Maharashtra Budget Session Update :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीवर बोट ठेवत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचा हक्कभंग झाल्याचा आक्षेप घेतला आहे.

विजय वडेट्टीवारांनी नियमावर ठेवलं बोट
विजय वडेट्टीवारांनी नियमावर ठेवलं बोट
मुंबई, (राहुल प्रभू, प्रतिनिधी) : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र, या अर्थसंकल्पावरुन सभागृहाचा हक्कभंग केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अंतरिम अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र, तो मंजूर झाला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट जीआर पटलावर ठेवला, हा सभागृहाचा हक्कभंग असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सभागृहात हक्कभंग
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे जातो, त्यानंतर योजना लागू होतात. असं असताना आज मुख्यमंत्र्यांनी थेट जीआर पटलावर ठेवला. हा सभागृहाचा हक्कभंग होतो, असा आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला. हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
advertisement
अंतरिम अर्थसंकल्प मांडला असला तरी तो मंजूर झालेला नाही. हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही असा सवाल करत विरोधी पक्षनेते यांनी यावर आक्षेप घेतला. अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली.
advertisement
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
  • - केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी
  • -केंद्राचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लागेल अशी अपेक्षा बाळगतो.
  • - राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
  • - नवीन रुग्न वाहीका खरेदी केल्या जातील
  • - मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना रायबिवली जाईल
  • - वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील
  • - बच्चच गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार निधी देण्यात येईल
  • - यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
  • - व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
advertisement
मराठी बातम्या/Politics/
State Budget 2024 : 'मुख्यमंत्र्यांची 'ती' कृती म्हणजे सभागृहाचा हक्कभंग'; विजय वडेट्टीवारांनी नियमावर ठेवलं बोट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement