Tirtha Darshan Yojana : आषाढी एकादशीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Tirtha Darshan Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत केल्यानंतर शिंदे सरकारने आणखी एक योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आषाढी एकादशीची पंढरपूरची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून अबालवृद्ध पंढरीच्या दिशेने पायी निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर दिली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Tirtha Darshan Yojana) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
advertisement
वाचा - 'IAS लोकांनी स्वतःला सर्वज्ञानी..' नितीन गडकरींना सर्वांसमोर अधिकाऱ्यांना झापलं
यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.
यावेठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास फ्री
सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने सर्व 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बसचा प्रवास विनामूल्य करण्यात आला आहे. तसेच महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2024 3:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Tirtha Darshan Yojana : आषाढी एकादशीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा