सभागृहात घडलेल्या प्रकारावरुन उपसभापती नाराज
विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घडलेल्या प्रकाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. अंबादास दानवे यांनी सभागृहात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का? हे उद्या सचिवालयाच्या मार्फत तपासून घेण्यात येणार आहे. उद्या संसदीय मंत्र्यांसोबत पक्षीय गटनेत्यांची नीलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक पार पडेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणी काय कारवाई करायची याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
राज्याच्या विकासासाठी ज्या विधीमंडळातून निर्णय घेतले जातात, जिथं नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा केली जाते. त्याच दालनात सदस्य शिविगाळ करण्यापर्यंत पोहचलेत. विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यातला वाद शिविगाळीपर्यंत गेला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या टीप्पणीनंतर अंबादास दानवेंनी शिवीगाळ केला. त्यानंतर त्याच भाषेत प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं.
वाचा - विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर; कुणाला मिळाली संधी?
प्रसाद लाड
हा प्रस्ताव लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्यांना इटलीला पाठवून द्या.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
सभापती महोदया, माझा मुद्दा हा आहे जो काही वक्तव्य आहे, त्याचं आहे. लोकसभेत झाला आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का. मला असं वाटतं, हिंदुत्त्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये असं म्हणत दानवे अचानक भडकले आणि लाड यांच्याकडे धावून गेले…‘ये माझ्याकडे हात नाही करायचा…तिकडे करायचा…XXX (शिवी) XXXद…"