Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Last Updated:

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे.

काँग्रेस नेते
काँग्रेस नेते
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. त्यामुळे प्रत्येकपक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपने बाजी मारली असून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही विधान परिषदसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख आहे.
कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
भाजपकडून 5 जणांना संधी
विधान परिषदेसाठी 10 नावे महाराष्ट्र भाजपनं पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी ही नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली होती. यात पंकजा मुंडे यांच्यासह 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
  • पंकजा मुंडे
  • अमित गोरखे
  • परिणय फुके
  • सदाभाऊ खोत
  • योगेश टिळेकर
दरम्यान, नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडकीचे दोन निकाल हाती आले आहे. यामध्ये ठाण्याचा गड राखण्यात भाजपला यश आलं आहे. तर ठाकरेंनीही मुंबई पदवीधर मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. तर उबाठाचे नेते अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहे.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर; कुणाला मिळाली संधी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement