सोलापूरला आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, सोलापूरला बोललो ते सगळ्यांनी पाहिलं. जाणीवपूर्वक बातम्या केल्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही भूमिका मनसेच्या स्थापनेपासूनच आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं कारण राज्यात संधी उपलब्ध आहेत. पण त्या संधी बाहेरच्या मुलांना मिळतात, स्थानिकांना मिळत नाहीत. या संधीचा योग्य वापर झाला तर आरक्षणाची गरजच नाही. आंबेडकर, फुले, शाहू आर्थिक गरजूंना आरक्षण द्यावं या मताचे होते.
advertisement
Uddhav Thackeray : ठाकरेंचं दिल्लीत लोटांगण; ठाण्यात मेळाव्याआधी बॅनरवॉर, वातावरण तापलं
मनोज जरांगेंबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात मनोज जरांगे यांचा विषयच नव्हता. त्यांच्या मागे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मराठवाड्यातील काही पत्रकार यात सामील आहेत. काहींना जागा, प्लॉट आणि गाड्या कशा मिळाल्या हे मला माहिती असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी आरोप केला.
संविधान बदलणार हे भाजपचे लोक बोलले आणि त्याचा परिणाम झालाय. जरांगेंमुळे काहीही झालं नाहीय. जरांगे पाटील यांच्या आडून विरोधी पक्ष राजकारण करतायत. शरद पवार मणिपूर होईल म्हणतात म्हणजे यांच्या डोक्यात काय चाललंय ते दिसतंय. दंगल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला.
ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; म्हस्केंचा आरोप; कोण आहेत गुप्ता बंधू?
माझ्या दौऱ्यात अनेक अडचणी आल्या. माझे मोहोळ उठले तर यांना सभा घेणं मुश्किल होईल. माझ्या नादाला लागू नये. याच्या राजकारणाचा बेस यावरच आहे. यांचा राज फडणवीस यांच्यावर आहे तर यांनी समाजावर राग काढू नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
