मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान
“अनिल देशमुखांनी माझ्या विरोधात अहेरी मतदारसंघातून निवडणूक लढावी”, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं. तसेच जर आपल्याला पक्षाने सांगितलं तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघामधूनही आपण निवडणूक लढवू शकतो, असंही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील अशी चर्चा आहे. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “अनिव देशमुखांनी माझ्या अहेरी मतदारसंघामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे. ते विदर्भातील चांगले नेते आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात उभं राहायला काही अडचण नाही. असं आव्हान धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे.
advertisement
वाचा - भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! विखे पाटलांवर पक्षातील नेत्याचाच गंभीर आरोप
बाबा आत्राम खूप छोटा आहे, अनिल देशमुख यांचा खोचक टोला
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख हे फडणवीस यांच्या विरुद्ध लढतील तर त्यांची जमानत जप्त होईल, असा वक्तव्य केलं होतं यावर अनिल देशमुख यांनी बाबा आत्राम खूप छोटा आहे, असा खोचक टोला लगावला.