Radhakrishna Vikhe Patil : भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! विखे पाटलांवर पक्षातील नेत्याचाच गंभीर आरोप
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Radhakrishna Vikhe Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
अहमदनगर, (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये धुसफूस वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिर्डी विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली होती. त्यानंतर विखे पाटलांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला आहे.
पिपाडा आणि विखेंमध्ये जुना वाद?
2009 साली डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. अतंत्य चुरशीची ठरलेल्या त्या निवडणुकीत पिपाडा यांचा अवघ्या 13 हजारच्या फरकाने पराभव झाला होता. 2019 साली काँग्रेसला रामराम करत विखे पाटीलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिपाडा आणि विखे पाटील या कट्टर विरोधकांची मनोमिलन घडवण्यात त्यावेळी देवेंद्र फडणविस यांना यश आले होते. मात्र, आता पुन्हा पिपाडा यांनी विखे पाटील पिता- पुत्रांविरोधात शड्डू ठोकला. विखे पाटील हे भाजपच्या नेत्यांनाच त्रास देत असुन ते पक्षात आल्यानंतर पक्षाची अधोगती झाल्याच पिपाडा यांनी म्हटलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांचेमुळे जिल्ह्यात भाजपच्या पाच आमदारांचा पराभव झाला तर या लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि नगर लोकसभा गमवावी लागल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला आहे.
advertisement
विखे पाटलांच्या सांगण्यावरुन हल्ला?
भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत विखे पाटलांच्या कार्यशैलीबाबत आक्षेप घेत टीका केली होती. यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला. 2009 साली डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भाजपतर्फे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, आता दोन्ही एका पक्षात आले असून दोघांच्या धुसफूस वाढली आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 26, 2024 3:32 PM IST
मराठी बातम्या/अहमदनगर/
Radhakrishna Vikhe Patil : भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर! विखे पाटलांवर पक्षातील नेत्याचाच गंभीर आरोप