काय म्हणाले प्रवीण दरेकर?
भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, या सभागृहात आम्ही नवीन सदस्य होतो, तेव्हा भाजीपाला आणला होता. त्यावेळी आमच्यावर कारवाई करण्यात आलेली. तशीच अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एवढ्या मोठ्या संविधान पदावर विरोधी पक्षनेते बसलेत तरी त्यांना नियम माहीत नाही? त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांच्यावर कविता केली.
advertisement
प्रविण दरेकर : खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. विचारा तूच तुझ्या मना महाराष्ट्रात सुरु आहे विकास गंगा..
निलम गोऱ्हे : तुम्ही करु नका एकमेकांना खानाखुना, केसरकर साहेब तुम्ही सिनेमातल्या हिरोप्रमाणे आलात सगळं संपल्यावर. यानंतर सभागृहात हशा पिकला.
वाचा - विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; संख्याबळात कुणाचं पारडं जड?
अंबादास दानवे यांच्यावर झाली होती निलंबनाची कारवाई
अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केलं. अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात 5 दिवस सहभागी होता येणार नव्हतं. मात्र अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे.