Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; संख्याबळात कुणाचं पारडं जड?

Last Updated:

Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची वेळ संपली असून 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
मुंबई : लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या 2 आघाडींमधील कुणाचा उमेदवार पडणार? यावर बरच काही अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व आलं आहे.
विधान परिषद निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला
विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली असून निवडणूकीतून कुणीही माघार घेतली नाही. परिणामी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तृमाने, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत.
advertisement
महायुतीचं संख्याबळ काय?
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. या संख्याबळाच्या जोरावर त्यांचे 2 उमेदवार विजयी होण्याची शक्यता मानली जातेय. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज आहे.
advertisement
महाविकास आघाडीकचं काय?
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मत निर्णायक ठरू शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंना आणखी काही मतांची गरज लागणार आहे.
advertisement
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने एक उमेदवार पडणार हे निश्चत आहे. आता तो कोणाचा पडतो? यावरुन चर्चा सुरू आहेत.
मराठी बातम्या/Politics/
Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; संख्याबळात कुणाचं पारडं जड?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement