Maharashtra Politics : जयंत पाटील सोबत आले तर...,अजितदादांची अधिवेशनात अशीही ऑफर, एकच हश्शा

Last Updated:

अजित पवार यांनी शेरोशायरी, कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

News18
News18
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं. यावेळी अजित पवार यांनी शेरोशायरी, कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तसंच त्यांना अप्रत्यक्ष ऑफरही दिली. आषाढी वारी आणि पालखी सोहळ्यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, हल्ली सर्वांना पालखीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे. जयंतराव येतील असे मला वाटत नाही. ते सोबत आले तर मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे.
तुकाराम महाराजांना चारशे वर्षे होऊनही त्यांचे विचार समर्पक आणि मार्गदर्शक आहे. प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळांच्या माथी काठी हाणण्याती ताकद होती. संत तुकाराम महाराजांशी आमचं वर्षानुवर्षाचं नातं आहे. पालखी बारामतीतून जाते,मुक्काम असतो, काठेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून स्वागत करतो असंही अजित पवार यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर मला तुकाराम महाराज आठवले असं काहींनी म्हटलं असं म्हणत टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी उत्तर दिलं.
advertisement
तुकाराम महाराज आमच्या श्वासात , ध्यासात, विचारात आणि रक्तात आहेत. ते आठवावे लागत नाहीत. लोकसभा येतील जातील, कोणालाही चांगलं यश मिळालं तर आनंद होतोच. तुम्हाला मिळालं आनंद वाटणं स्वाभाविक आहे. तुकाराम महाराजांचे विचार आमच्यासोबत आहेत. इतर संतांच्या पालख्या आमच्या बारामतीतून जातात. त्यामुळे तुमच्या आरोपात तथ्य नाही असं अजित पवार म्हणाले.
advertisement
जयंत पाटील यांनी सभागृहात विंदा करंदीकरांची कविता वाचून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी विंदा करंदीकर यांचीच कविता सभागृहात वाचून दाखवली. एवढे लक्षात ठेवा ही कविता अजित पवार यांनी वाचली.
एवढं लक्षात ठेवा
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
advertisement
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
advertisement
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Politics : जयंत पाटील सोबत आले तर...,अजितदादांची अधिवेशनात अशीही ऑफर, एकच हश्शा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement