भाजपने सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही दोन उमेदवार आहेत. तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शेकापने प्रत्येकी एक उमेदवार मैदानात उतरवला आहे. भाजपने आमचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची तीन मतं कमी आहेत. तर शिंदे सेनेचे 39 आमदार असून त्यांच्याकडे 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील.
advertisement
अजितादादांचं गणित जुळणार का?
शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिलाय. त्यांचे 15 आमदार आणि जयंत पाटील अशी मिळून 16 मतं आहेत. त्यांना आणखी 7 मतं लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 39 आमदार आहेत. त्यांचे 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे. यासाठी काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसची तीन मते असल्याचं म्हटलं जातंय. तर ठाकरे गटाकडे 15 आमदार असून त्यांना आणखी 8 मतांची गरज आहे. त्यांच्याकडे एक अपक्ष आहे.
वाचा - भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; व्हायरल VIDEO नंतर म्हणाल्या..
काँग्रेसची मते कुणाकडे वळणार?
काँग्रेसने एकच उमेदवार मैदानात उतरवला असून त्यांच्याकडे 37 मते आहेत. प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 23 मतं लागणार आहेत. उरलेली 14 अतिरिक्त मतं काँग्रेसकडे राहतील. ही मतं कुणाला मिळणार यावर इतर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील असं भागित शेकाप नेते जंयत पाटील यांनी केलंय. त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांची नजर असणार आहे.