Maharashtra MLC Election 2024: भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; व्हायरल VIDEO नंतर म्हणाल्या..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Assembly Monsoon Session : महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असताना भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेची निवडणूक सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे. दुसरीकडे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित याबद्दल खुलासा केला आहे.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?
भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी ठेवले? याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आमदार राजेश पवार सभागृहात बोलत असताना पाठीमागच्या बाकावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर बसलेल्या आहेत. यावेळी त्या एका फाईलवर स्वाक्षरी करतात. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात.
advertisement
सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.
मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज…— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) July 12, 2024
advertisement
आमदार मेघना बोर्डीकर यांचा खुलासा
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे" असा खुलासा बोर्डीकर यांनी केला.
advertisement
विधानपरिषेदत आज मतदान
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान सुरु आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे एका जागेवर कुणाचा गेम होणार आणि कोण बाजी मागणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा आहे. त्यामुळे मविआ किंवा महायुतीच्या एका उमेदवाराचा गेम होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 3:42 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra MLC Election 2024: भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; व्हायरल VIDEO नंतर म्हणाल्या..