सभागृहात हक्कभंग
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे जातो, त्यानंतर योजना लागू होतात. असं असताना आज मुख्यमंत्र्यांनी थेट जीआर पटलावर ठेवला. हा सभागृहाचा हक्कभंग होतो, असा आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला. हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.
अंतरिम अर्थसंकल्प मांडला असला तरी तो मंजूर झालेला नाही. हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही असा सवाल करत विरोधी पक्षनेते यांनी यावर आक्षेप घेतला. अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली.
advertisement
वाचा - आषाढी एकादशीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची गुड न्यूज! विधानसभेत घोषणा
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
- - केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी
- -केंद्राचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लागेल अशी अपेक्षा बाळगतो.
- - राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
- - नवीन रुग्न वाहीका खरेदी केल्या जातील
- - मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना रायबिवली जाईल
- - वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील
- - बच्चच गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार निधी देण्यात येईल
- - यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
- - व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2024 4:08 PM IST
मराठी बातम्या/Politics/
State Budget 2024 : 'मुख्यमंत्र्यांची 'ती' कृती म्हणजे सभागृहाचा हक्कभंग'; विजय वडेट्टीवारांनी नियमावर ठेवलं बोट