पुणे : पुणे तिथे काय उणे, असे अनेक वेळा आपण म्हणतो आणि याची प्रचिती नेहमीही आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पुण्याची वाहतूक कोंडीही पुणेकरांना काही नवीन नाही. पण या दरम्यान, आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील एका वाहन चालकाने तब्बल 154 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला 1 लाख 21 हजार रुपये दंड केला आहे. तर तर दुसऱ्या वाहनावर 130 वेळा कारवाई झाली आहे. ही करावाई गाडीच्या किमती पेक्षा ही जास्त आहे. नेमका काय आहे हा प्रकार ते जाणून घेऊयात.
advertisement
पुणे पोलिसांनी सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त तर तब्बल 988 वाहनांवर 50 पेक्षा जास्तवेळा वाहतूक नियमन मोडल्याबाबत कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाहन चालकांनी कोणीत्यारी नियमाचे उल्लंघन करू नये आणि केला असेल तर त्याचा दंड भरावा. तसेच नियमांच पालन करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून केले जात आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी विविध पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच नियम मोडलेल्या गाड्यांवर कारवाईही सुरु आहे. यामध्ये लायसन्स रद्द करणे, तसेच गाडी आणि वाहन चालकांना शोधून ती कारवाई करण्यात येत आहे.
Friendship Day 2024 : या 'फ्रेंडशिप डे'ला बनवा घरच्या घरी बॅण्ड, फारच सोपी आहे पद्धत, VIDEO
सर्वसाधारणपणे जे सर्व्हिस देतात, यामध्ये ब्लॅकिट, स्विगी, झोमॅटो या अशा वाहन चालकांचा सर्वाधिक समावेश आहे. या व्यतिरिक्त काही परमिटची देखील वाहने यामध्ये आहेत, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. अशा सर्व परिस्थितीत वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे.





