Deep Amavasya 2024 : श्रावण महिन्याच्या आधी दीप अमावस्या, घरात येणार सुख आणि शांती; जाणून घ्या, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आषाढ अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट, असे म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटले जाते. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावास्येच्या दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते.
advertisement
यावर्षी आषाढ अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट, असे म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024 ला श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत.
advertisement
दीप अमावस्येचे महत्त्व -
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख-शांती लाभते
दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त -
पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुरू होईल तर 4 ऑगस्टला दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल.
advertisement
'या' मंत्राचा जप करा -
पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करावा. हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा या मंत्राचा अर्थ असा होतो, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली.
advertisement
सूचना - वर दिलेली माहिती ही ज्योतिष, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 03, 2024 10:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Deep Amavasya 2024 : श्रावण महिन्याच्या आधी दीप अमावस्या, घरात येणार सुख आणि शांती; जाणून घ्या, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व