मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांकडून केबल टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं. एका ठिकाणी ड्रेनेजमध्ये केबल टाकण्यासाठी बीएसएनएलचे कर्मचारी उतरले. मात्र, विषारी वायूमुळे 3 कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. तिन्ही कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तातडीने शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट नंबर 65 सेक्टर नंबर 27 प्राधिकरण निगडी समोरील रस्त्याच्या कडेला ही घटना घडली आहे. बीएसएनएलच्या inspection चेंबरमध्ये बीएसएनएल ऑफिस आकुर्डी येथील 03 कंत्राटी कामगार ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी उतरले होते. पण अचानक श्वास गुदमरून तिघे मयत झाले आहेत. दत्ता होलारे, लखन धावरे ( दोघेही राहणार गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (राहणार बिजलीनगर) अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.
