TRENDING:

पुणेकर तरुणांनी जागवला आग्र्याहून सुटकेचा थरार, महाराजांना दिली अनोखी मानवंदना

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आग्र्याहून सुटकेला इतिहासात महत्त्व आहे. याच घटनेला 356 वर्षे पूर्ण झाली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 5 सप्टेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला 356 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पुण्यातील इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षी पुणे - शिवनेरी - पुणे अशा 200 किमी सायकल राईडचे आयोजन केले जाते. यंदा या मोहिमेच्या चौथ्या वर्षी 575 सायकल स्वारांनी यामध्ये सहभाग घेतला. पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देत सायकलस्वारांनी शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
advertisement

ऐतिहासिक घटनेला 356 वर्षे पूर्ण

छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे. शिवाजी महाराज आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 साली सुटले होते. आग्रा येथून निघून महाराज मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर 30 ऑगस्ट रोजी पोहचले होते. या घटनेला यावर्षी 356 वर्ष पूर्ण झाली आहेत.

advertisement

7 पिढ्यांची संगीत परंपरा असलेल्या महाराष्ट्र शाहीर कसा झाला जगभर फेमस?

पुणेकर तरुणांची अनोखी मानवंदना

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित केली जाते. मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईडला झेंडा दाखवून सुरुवात झाली. एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले, असे आयएएसचे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.

advertisement

32 देश आणि 30 हजार किलोमीटर आणि 120 दिवस! पुणेकर कुटुंब कारनं गाठणार लंडन

कसा होता मार्ग?

पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग - नाशिक फाटा - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - शिवनेरी असा होता. अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व सायकलस्वार ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर तरुणांनी जागवला आग्र्याहून सुटकेचा थरार, महाराजांना दिली अनोखी मानवंदना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल