7 तास पोहून अनिल मगर यांनी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला आहे. अनिल मगर यांनी सांगितले की, "माझा वाढदिवस 10 डिसेंबर रोजी असतो. मात्र मी 9 डिसेंबर रोजी सलग सात तास पोहून हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. बालगंधर्व येथील नांदे तलावात सकाळी 10 वाजेपासून मी माझ्या जलप्रवासाला सुरुवात केली. मी स्विमिंग कोच आणि योग शिक्षक असून न थांबता पोहोत सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. मी वयाच्या 10 व्या वर्षापासून जलतरणाची सुरुवात केली आहे."
advertisement
आतापर्यंत अनिल मगर यांनी 50 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील पूल तसेच ओपन वॉटर स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. समुद्रातही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत अनेक लांब पल्ल्याची अंतर यशस्वीपणे पार केली आहेत. पुढील काळात असे उपक्रम ते स्वतःसाठीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजची पिढी मोबाईलमध्ये जास्त अडकून बसली आहे. सकारात्मक राहायचे असेल आणि मानसिक ताकद वाढवायची असेल, तर सतत ॲक्टिव्ह राहणे गरजेचे आहे, असे अनिल मगर यांनी सांगितले. वय काहीही असो, इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.