दिवाळी आणि छटपूजेच्या काळात दरवर्षीप्रमाणे प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे यंदा रेल्वे प्रशासनाने एक हजार अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. याचे नियोजनही पूर्ण करण्यात आले होते. दिवाळीच्या काही दिवस आधी आणि नंतर या गाड्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला.
गाड्या रद्द करण्यामागचे कारण ?
फक्त दिवाळीपर्यंतच रेल्वेने जादा चालवलेल्या साडेचारशे फेऱ्यांमधून सुमारे सात लाख प्रवाशांनी प्रवास केला. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. सण संपल्यावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक गाड्या अर्ध्या रिकाम्या धावताना दिसत आहेत. काही गाड्या फक्त 60 ते 70 टक्केच भरत असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
advertisement
याच कारणामुळे रेल्वे बोर्डाने प्रवाशांचा कमी प्रतिसाद पाहून पुणे आणि मुंबई विभागातील काही गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांची मागणी पुन्हा वाढल्यास या गाड्या परत सुरू केल्या जातील.
रद्द केलेल्या पुण्यातील गाड्या
रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून एकूण 76 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. हडपसर–लातूर, नागपूर–हडपसर, पुणे–अमरावती, कोल्हापूर–सीएसएमटी, कोल्हापूर–कलबुर्गी अशा विविध मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचे नियोजित प्रवास बिघडणार आहेत..
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सांगितले केले आहे की, तिकीट आरक्षण करण्यापूर्वी गाडीचे सध्याचे वेळापत्रक तपासावे. दिवाळीनंतर कमी झालेला प्रवास हा रेल्वेच्या निर्णयामागचा मुख्य कारण आहे. त्यातच रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे फक्त तात्पुरते करण्यात आले असून जर प्रवाशांची संख्या वाढल्यास सर्व गाड्या पूर्ववत सुरू केल्या जातील.
