TRENDING:

स्पेशल पुणेरी भेळ, 82 वर्षांची आहे परंपरा, पण नेमकी मिळते कुठे? VIDEO

Last Updated:

famous bhel in pune - हे 82 वर्ष जुने दुकान आहे. त्यांच्या मागील तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. ही भेळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. याठिकाणी एकूण 3 प्रकारच्या भेळ बनवल्या जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे :  पुण्याची खाद्यसंस्कृती ही अनेकांना आपल्या प्रेमात पाडते. पुण्याची ओळख सांगणारी अनेक असे काही प्रसिध्द ठिकाण आहेत जे त्यांच्या खाद्यपदार्थांची तिच चव वर्षानुवर्षे जपत आहेत. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणारी गुप्ता भेळ हेसुद्धा तब्बल 82 वर्षांची पंरपरा आजही जपत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1942 पासून ते आजपर्यंत येथील भेळ तितकीच लोकांची आवडती भेळ आहे. याचबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.

advertisement

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता म्हणजे शिवाजीनगर परिसरात असणारे गुप्ता भेळ आणि फरसाण हे 82 वर्ष जुने दुकान आहे. त्यांच्या मागील तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. ही भेळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. याठिकाणी एकूण 3 प्रकारच्या भेळ बनवल्या जातात.

उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आजोबांनी या फेरीवरच्या भेळच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर शिवाजीनगर भागात दुकान घेऊन तेथून हा व्यवसाय आजपर्यंत सुरू आहे. याठिकाणी भेळमध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे साधी भेळ. यामध्ये फरसाण, मुरमुरे येतात. दुसरं म्हणजे ओली भेळ. यामध्ये चिंचेचं पाणी, कांदा, तिखट टाकून तयार केली जाते. तिसरा प्रकार मटकी भेळचा आहे, अशी माहिती व्यावसायिक ईश्वरदीन गुप्ता यांनी दिली.

advertisement

MPSC Result : वडील करतात बुक बायंडिंग तर आईचा ब्युटिपार्लरचा व्यवसाय, मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर

यासाठी लागणारे फरसाण ते स्वतः कारखान्यात तयार करतात. तसेच शेवचे वेगवेगळे प्रकारही बनवतात. एकेकाळी पैसे आणि आण्यात ही भेळ विक्री केली जात होती. आज भेळीची किंमत 20 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत आहे. तर ओली भेळ ही 40 रुपयांना मिळते. सध्या इथे 4 ते 5 लोक काम करतात.

advertisement

याठिकाणी सकाळी 8 पासून हे दुकान सुरू होते. तर दुपारी 2 पर्यंत चालू असते आणि पुन्हा 4 नंतर सुरू होते. आम्ही उत्तम क्वालिटीचे सामान वापरुन हे फरसाण तयार करतो. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. लांबून लांबून इथे लोक भेळ खाण्यासाठी येतात, असेही व्यावसायिक ईश्वरदीन गुप्ता यांनी सांगितले. तर मग तुम्हालाही या भेळची चव चाखायची असेल तर तुम्हीही याठिकाणी भेट देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
स्पेशल पुणेरी भेळ, 82 वर्षांची आहे परंपरा, पण नेमकी मिळते कुठे? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल