MPSC Result : वडील करतात बुक बायंडिंग तर आईचा ब्युटिपार्लरचा व्यवसाय, मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
mpsc result - मूळचा कोल्हापूरचा असणारा विनीत शिर्के हा एका सामान्य कुटूंबातील आहे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालात त्याने राज्यात सातवा क्रमांक पटकावला आणि त्याची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : मनाशी बाळगलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी जर प्रामाणिक प्रयत्न केले तर अशक्य असे काहीच नाही. हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. कोल्हापूरच्या विनीतने राज्य सेवा मुख्य परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. त्याची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.
मूळचा कोल्हापूरचा असणारा विनीत शिर्के हा एका सामान्य कुटूंबातील आहे. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालात त्याने राज्यात सातवा क्रमांक पटकावला आणि त्याची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. राज्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीत त्याचा सातवा क्रमांक आहे आणि ओबीसी या श्रेणीत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
advertisement
2020 पासून गेली चार वर्षांपासून विनीत स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. तर त्याचे वडील हे बुक बायंडिंग आणि रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करतात. तर आई ब्युटीपार्लर चालवते. या परीक्षेचा अभ्यास त्याने सेल्फ स्टडी करुनच केल्याचे सांगितले. यामध्ये त्याने काही गोष्टींसाठी फक्त टेस्ट सिरिज लावल्या होत्या. मात्र, जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवर भर दिल्याचे त्याने सांगितले.
advertisement
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
कॉलेजमध्ये असताना टेक महेंद्रा कंपनीमध्ये जॉबसाठी निवड झाली होती. मात्र, मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असल्याने ती नोकरी जॉईन केली नाही. सगळे चार प्रयत्न करून आज हे यश मिळवले आहे. यासाठी मी खूप मेहनत केली, या परिक्षेची तयारी करत असताना घरच्यांचा मोठा पाठिंबा मिळाला, या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 28, 2024 3:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MPSC Result : वडील करतात बुक बायंडिंग तर आईचा ब्युटिपार्लरचा व्यवसाय, मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर