राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि रोहित पवार हे काका पुतणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार हे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 32 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. यावेळी रोहित पवारांनी काका अजितदादांवर स्तुतीसुमनं उधळली.
advertisement
"पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या लोकांनी इथं केला आहे. हे सगळं पाहून मला एक सिनेमा आठवतोय KGF नावाचा तो सिनेमा आहे. त्यामध्ये एक गरूडा नावाचा व्हिलन आहे. गरुडाचे केस असे वाढलेले आहे. इथं दोन गरुडा आहे, एक दाढीवाला गरूडा ( भाजप आमदार महेश लांडगे) आहे, एक बिना धाडीवाला गरुडा (भाजप आमदार शंकर जगताप ) आहे. ही लोक काय करताय, केजीएफमध्ये खाणीतली सोनं काढण्यासाठी त्याचीच माणसं, सोनं विकण्यासाठी त्याची माणसं असतात. माणसं लागत असेल तर गरूडा त्याचीच माणसं आहे. जग आपलंच आहे, असं वागायची. आता इथं दोन गरूडा असेच वागताय, महापालिका स्वत:ची मालमत्ता आहे, असं वागत आहे. छोटे कंत्राटदार असतील, मोठे कंत्राटदार असतील या सगळ्या गोष्टांमध्ये या लोकांनी मलिदा खाल्ला आहे" अशी टीका रोहित पवारांनी केली.
'अजितदादा रॉकीभाई'
या शहरावर कुणाचा हक्क असेल तर सर्वसामान्य माणसांचा आहे. KGF सिनेमामध्ये आपण पाहिलं तर एक रॉकीभाई आहे, काय केलं त्यानं सर्व सामान्य माणसांची बाजू मांडली. गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची असेल, मक्तेदारी असेल तर ती मोडीत काढायची. आजच्या महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये या भागात जर कुणी रॉकीभाई असेल तर ते आपले अजितदादा. अशी आजची परिस्थिती आहे. हे सामराज्य आहे जे तुमच्या सर्वांचं आहे. इथं तुमचा अधिकार आहे. तुमच्या सगळ्यांची सत्ता इथं आणायची आहे' असं म्हणत रोहित पवारांनी अजितदादांवर स्तुतीसुमनं उधळली.
