श्यामराव नारायण मनवे (७१ वर्षे) हे अजित पवारांकडे गेली २७ वर्षे चालक म्हणून काम करत आहेत. श्यामारवा मनवे हे 1999 पासून अजित पवारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत आहेत. मुंबईतील काल अजितदादांच्या रात्री बैठका संपल्यानंतर आपण रात्रीच बारामतीला कारने जाऊ असे श्यामराव म्हणाले. परंतु अजित पवारांनी त्यांनी नकार दिला आणि म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून तिथे येतो... दादांच्या पुढे कोण जाणार म्हणून श्यामराव काही म्हणाले नाही. बुधवारी सकाळी ही बातमी समोर येताच त्यांना मोठा धक्का बसला. आता माझं आयुष्य थांबलं आहे, असे म्हणत भावनांना वाट मोकळी करुन दिली.
advertisement
पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव
अजित पवार बुधवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती. अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना श्यामराव मनवे म्हणाले की, अजितदादांकडे मी गेली 27 वर्षे चालक म्हणून काम करत आहे. दादा माझे दैवत होते, गणपतीत देखील ते माझ्या घरी जेवायला यायचे. 2013 साली मी निवृत्त झालो, त्यानंतर मी अजित दादांसोबत काम करत आहे. सकाळी 7.30 वाजता दादा बंगल्यावरून निघाले आणि तासाभरात ही बातमी आली. जर दादांनी काल ऐकले असते तर आज हे घडलेच नसते. दादांनी आमचे ऐकायले हवे होते, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. श्यामराव मनवे यांनी लोकमतशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
सुनेत्रा पवार कोलमडल्या
विमान दुर्घटनास्थळावरून अजित पवार यांचं पार्थिव प्रथम रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार कोलमडलेल्याच अवस्थेत बारामतीत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होते. सुनेत्रा पवार यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसली आणि या भेटीदरम्यानचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली.
