TRENDING:

'गुलाबी' जॅकेट कायमचं विसावलं! 'ते' 18 गुलाबी जॅकेट शिवून दादांनी उभारली होती 41 आमदारांची भिंत; त्या राजकीय गुपिताची कहाणी

Last Updated:

त्यांनी स्वतःसाठी तब्बल १८ खास जॅकेट शिवून घेतली होती. विरोधकांनी त्यांच्या या रंगावरून टीका केली, तेव्हाही दादांनी न चिडता विनोदी शैलीत त्यांना उत्तरे दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राजकारणात डावपेच आणि रणनीती जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते नेत्याची 'इमेज'. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यांनंतर अजित पवार यांनी आपल्या प्रतिमेत केलेला आमूलाग्र बदल हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. केवळ रणनीती म्हणून नव्हे, तर महिला आणि तरुणांशी नाते जोडण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला 'गुलाबी रंग' आज त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा आठवणींच्या रूपात समोर आला आहे.
'ते' 18 गुलाबी जॅकेट
'ते' 18 गुलाबी जॅकेट
advertisement

प्रेमाचा रंग आणि १८ खास जॅकेट

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपला ब्रँडिंग पॅटर्न बदलला. प्रेमाचा आणि आपुलकीचा संदेश देण्यासाठी 'डिझाइन बॉक्स्ड' कंपनीच्या सल्ल्यानुसार त्यांनी गुलाबी रंग स्वीकारला. अजित दादांनी स्वतःही हा बदल मनापासून स्वीकारला होता. शासकीय बैठका असोत किंवा प्रचार सभा, दादा नेहमी गुलाबी किंवा किरमिझी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसायचे. यासाठी त्यांनी स्वतःसाठी तब्बल १८ खास जॅकेट शिवून घेतली होती. विरोधकांनी त्यांच्या या रंगावरून टीका केली, तेव्हाही दादांनी न चिडता विनोदी शैलीत त्यांना उत्तरे दिली.

advertisement

'लाडकी बहीण' आणि गुलाबी क्रांती

हा केवळ रंगाचा बदल नव्हता, तर ती एक राजकीय रणनीती होती. अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी जाहीर केलेल्या योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करताना गुलाबी रंगाने महिला वर्गाचे लक्ष वेधून घेतले. पक्षाचे बॅनर, जाहिराती आणि सोशल मीडिया सर्व काही गुलाबी झाले. दादांनी केवळ स्वतःपुरताच हा रंग मर्यादित ठेवला नाही, तर मंत्री आणि आमदारांनाही निळ्या-पांढऱ्या ऐवजी गुलाबी रंग स्वीकारण्याचा सल्ला दिला होता.

advertisement

फायदा झाला आणि दादांनी सिद्ध केलं!

अनेक राजकीय विश्लेषकांनी या गुलाबी रंगाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि दादांनी सर्वांना चकित केले. या गुलाबी रणनीतीचा आणि महिलांशी वाढलेल्या संपर्काचा पक्षाला मोठा फायदा झाला आणि अजित पवारांचे ४१ आमदार निवडून आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर वाढले, शेवगा आणि डाळिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आज जेव्हा दादा आपल्यात नाहीत, तेव्हा मंत्रालयातील त्या बैठका आणि सभांमधील तो 'गुलाबी झंझावात' कायमचा शांत झाला आहे. पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजित पवारांचा हा 'गुलाबी प्रयोग' यशाचा एक वेगळा अध्याय म्हणून नक्कीच लक्षात राहील.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
'गुलाबी' जॅकेट कायमचं विसावलं! 'ते' 18 गुलाबी जॅकेट शिवून दादांनी उभारली होती 41 आमदारांची भिंत; त्या राजकीय गुपिताची कहाणी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल