TRENDING:

Ajit Pawar: अजितदादांनी जे लिहिलं ते वाचून वाटेल अभिमान, 5 दिवसांपूर्वीचा 'तो' VIDEO व्हायरल, तुम्ही कराल कौतुक

Last Updated:

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर अजितदादांचं विशेष लक्ष होतं. त्यामुळे शहरातील कोणत्याही कामासाठी सदैव हजर राहायचे. अलीकडेच झालेल्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. या विमान अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कामाचा माणूस गेला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून उमटत आहे. पण, अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते, त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकास कामामध्ये कधीही कमी पडू दिलं आहे. अलीकडेच झालेल्या पुणे ग्रँड टूरमध्ये अजितदादा आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
(अजित पवार)
(अजित पवार)
advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका हा सगळ्यांना महाराष्ट्राला सर्वश्रूत होता. सकाळी ६ वाजेपासून अजितदादा हे विकास कामाच्या कार्यक्रमांना हजर राहत होते. एक वेळेस अधिकारी पोहोचणार नाही, पण अजितदादा हे कार्यालयात आधी पोहोचले असायचं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर अजितदादांचं विशेष लक्ष होतं. त्यामुळे शहरातील कोणत्याही कामासाठी सदैव हजर राहायचे. अलीकडेच झालेल्या पुण्यातील बजाज सायकल ग्रँड टूरचं यशस्वी आयोजन झालं. पुण्यातील सगळे रस्ते हे गुळगुळीत आणि चकाचक झाले होते. खुद्द अजित पवार यांनी अभिनेता आमिर खान याच्यासोबत या कार्यक्रमाला आले होते. यावेळी अजितदादांनी सोशल मीडियावर ट्वीट केलं होतं.

advertisement

अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते की, " क्रीडा क्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, खेळाडूंना प्रोत्साहित करणं तसंच राज्याची आणि देशाची ओळख जागतिक स्तरावर उंचावणं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.! " असं म्हणत अजितदादांनी क्रीडा क्षेत्रासाठी सदैव काम करत राहणार, असं आश्वासन दिलं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर वाढले, शेवगा आणि डाळिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तसंच, पत्रकारांनी जेव्हा पुण्यातील रस्ते हे चांगले झाले आहे ते रस्ते आता असेल राहणार आहे ना, असं विचारलं असता अजितदादा मिश्किलपणाने म्हणाले की, 'बरोबर आहे, पुणेकरांच्या आवाहनाला नक्की प्रतिसाद देऊ, पालिका निवडणुकीत पुणेकरांनी एवढा कमी प्रतिसाद दिला की, आता बघावं लागणार आहे, आता गंमतीचा भाग जाऊ द्या. आता मतदारराजा काय ठरवायचं असेल ते मानायचं असतं. मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलतो. बांधकाम खात्याच्या लोकांशी बोललो आहे. काम करा, पण ती अशी करा, असं सांगितलं आहे. रस्ते इतके चांगले आहे की वाहतुकीची कोंडी झाली आहे. आम्हाला जास्त काम करावं लागणार आहे, ते आम्ही जास्त काम करू' असं आश्वासन अजितदादांनी दिलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar: अजितदादांनी जे लिहिलं ते वाचून वाटेल अभिमान, 5 दिवसांपूर्वीचा 'तो' VIDEO व्हायरल, तुम्ही कराल कौतुक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल