तू मनसुबे रचत होतास?
आमदार शंकर जगताप यांनी ज्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, त्याला अश्विनी जगताप यांनी थेट 'नमकहरामी' असं संबोधलं आहे. ही खरमरीत टीका भाजपचे उमेदवार माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर जगताप यांना उद्देशून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. "लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास?" अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमुळे माऊली जगताप हे भाऊंच्या हयातीतच त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पाहण्याचे स्वप्न पाहत होते का, असा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
advertisement
पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात
माऊली जगतापला उमेदवारी दिल्यानंतर त्याने गुलालात माखलेला एक फोटो आणि त्यासोबत 'पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं!' अशा आशयाची पोस्ट केली होती. "15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न, शपथ प्रत्यक्षात साकार झाले. साथ असावी आयुष्यभराची हीच माझी आशा... कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा... आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही... तुमच्या सगळ्यांचे आभार"
प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी
दरम्यान, शंकर जगतापांनी माऊली जगतापांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली. मुळात माऊली हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये रहायला आहेत. त्यामुळं माऊलीने प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केलं, असा आरोप केला जात होता. मात्र माऊली प्रभाग 31 चे उमेदवार असतील याची शंकर जगतापांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच खबर लागू दिली नाही, अशी चर्चा देखील सुरू झाली होती. अशातच आता आश्विनी जगताप यांच्या स्टेटसने मोठी खळबळ उडाली आहे.
