सामान्य कुटुंबातून येणाऱ्या नंदकुमार मते यांना लहानपणापासूनच इतिहासाची मोठी आवड होती. पुढे कुटुंब आणि उद्योग सांभाळत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. मूळचे खडवाकसला भागातील रहिवासी असलेल्या मते यांनी 2002 ते 2007 या काळात खडकवासला ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून देखील काम पाहिले. मात्र राजकारणात मन रमत नसल्याने त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. 2013 ते 2015 या काळात त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून 'मास्टर ऑफ आर्ट्स'चे शिक्षण पूर्ण केले. मात्र इतिहासावर प्रेम असलेल्या नंदकुमार मते यांनी पुढे सिंहगड किल्ल्यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
डेक्कन कॉलेजमधून त्यांनी सिंहगड किल्ल्यावर पाच वर्षाचे संशोधन करून पीएचडी प्राप्त केली. त्यांनी सिंहगड किल्ल्यावर सखोल अभ्यास करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेची निगडित ऐतिहासिक लढाया, स्थापत्य रचना, जनजीवन तसेच किल्ल्याचे धोरणात्मक महत्त्व या सर्वांवर आधारित संशोधन तयार केले. स्वतः प्रत्यक्ष केल्यावर जाऊन केलेली तपशीलवार पाहणे, पुरातन लेखसंग्रह आणि ऐतिहासिक तत्त्वांचा अभ्यास या त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंदकुमार मते यांनी सांगितले की,"इतिहासाची आवड असल्याने काहीतरी संशोधन करण्याचा छंद होता, मोडी लिपी शिकत असताना सिंहगड किल्ल्याबाबत आत्मियता निर्माण झाली. खडकवासला भागात राहायला असल्याने नेहमीच सिंहगड किल्ल्या बाबत मोठे कुतूहल असल्याने सिंहगड किल्ल्यावर संशोधन करून पीएचडी करण्याचा निर्णय घेतला."
व्यवसाय आणि कुटुंब सांभाळून जोपासला छंद
नंदकुमार मते हे बिल्डर व्यायसिक आहेत. लग्न झाल्यानंतर देखील त्यांनी 'मास्टर ऑफ आर्ट्स'चे शिक्षण घेतले,आणि पुढे सिंहगड किल्ल्यावर पाच वर्षे संशोधन करून त्यांनी पीएचडी प्राप्त केली. नंदकुमार मते यांच्या चिकाटीमुळे आज अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रेरित झाल्या असून, वय झाल्यानंतर शिक्षण घेण्याची नवी उमेद त्यांच्याकडे पाहून अनेक जणांमध्ये निर्माण झाली आहे.