TRENDING:

ट्रकमधील ऊसाला बांधलेला दोर गळ्यात अडकला अन्...; दौंडमधील दुचाकीस्वाराचा थरकाप उडवणारा शेवट

Last Updated:

ट्रकवरील ऊस बांधण्यासाठी वापरलेला जाड दोर ट्रकचालकाने नीट न बांधता तसाच लोंबकळत सोडला होता. वाऱ्याच्या वेगामुळे हा अधांतरी दोर थेट मागून येणाऱ्या अकबर यांच्या गळ्याभोवती गुरफटला आणि त्यांना फास बसला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दौंड शहरात एक काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या निष्काळजीपणामुळे एका ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अकबर करीम शेख (रा. ओमशांती नगर, दौंड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ट्रकचा दोर गळ्यात अडकला (प्रतिकात्मक फोटो)
ट्रकचा दोर गळ्यात अडकला (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

सोमवारी सकाळी अकबर शेख आणि त्यांची पत्नी नसरीन शेख हे दुचाकीवरून अहिल्यानगर-बारामती राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यांच्या पुढे उसाने भरलेला एक ट्रक जात होता. ट्रकवरील ऊस बांधण्यासाठी वापरलेला जाड दोर ट्रकचालकाने नीट न बांधता तसाच लोंबकळत सोडला होता. वाऱ्याच्या वेगामुळे हा अधांतरी दोर थेट मागून येणाऱ्या अकबर यांच्या गळ्याभोवती गुरफटला आणि त्यांना फास बसला.

advertisement

ट्रकचालकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतला: गळा आवळला गेल्याने अकबर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि पती-पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात अकबर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी नसरीन शेख गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

PMPML Bus: आता पीएमपीचा वेग मंदवणार! अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, नवे नियम लागू

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लाल सोन्यानं मार्केट खाल्लं! डाळिंबाला उच्चांकी दर, पुण्यात किती मिळाला भाव? Vid
सर्व पहा

याप्रकरणी मृत अकबर यांचा भाऊ शाहीद शेख याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालकाने दोर सुरक्षितपणे न बांधल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे दौंड परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
ट्रकमधील ऊसाला बांधलेला दोर गळ्यात अडकला अन्...; दौंडमधील दुचाकीस्वाराचा थरकाप उडवणारा शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल