MSRTCच्या नव्या या बस सेवेची सुरुवात शिवाजीनगर आगारातून करण्यात आली आहे. या मार्गात बस पुणे स्टेशन, चिंचवड आणि सायन मार्गे बोरीवलीपर्यंत प्रवास करेल. प्रवाशांना शहरातील गर्दी टाळून आणि आरामात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
सकाळी 6, 7, 8 आणि 9 वाजता तसेच दुपारी 1, 2, 3 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता या बसच्या फेऱ्या आहेत. MSRTCने सांगितले की, या सेवेचा उद्देश प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवास देणे आहे. विशेषतः पुणे-चिंचवड-बोरीवली मार्गावर रोज अनेक प्रवासी कामासाठी प्रवास करतात, त्यामुळे ही सेवा त्यांच्यासाठी खूप सोयीची ठरणार आहे.
advertisement
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, आणखी एका नवीन मार्गावर धावणार मेट्रो, तारीख आली समोर
प्रवाशांना सोयीस्करपणे बस तिकीट आधीच आरक्षित करता यावे यासाठी पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन आणि निगडी येथे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रवासी MSRTC मोबाईल ॲप किंवा https://npublic.msrtcors.com/ या संकेतस्थळावरूनही तिकीट ऑनलाइन आरक्षित करू शकतात. ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा सुरक्षित, आरामदायी आणि वेळ वाचवणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.






